आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जतमध्ये दमदार पावसाच्या सरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राशिन - कर्जत शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात रविवारी मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागातही सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
कर्जतमध्ये शनिवारी सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी बाराच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पावसास सुरुवात झाली. काही वेळातच शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. कर्जत शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा देणारा ठरले.

मराठवाड्यात बरसणार
राज्यातविदर्भाच्या दिशेने प्रवेश केलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने आपली आगेकूच रविवारी कायम ठेवली. मान्सून कोकणच्या दक्षिण भागात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या दक्षिण भागात कार्यरत झाला आहे. येत्या ४८ तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...