आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार रविवारी मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरात अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला आहे. मुळा धरणात रविवारी तब्बल ३२ हजार २२० क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरणातील जलसाठा हजार ६९३ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे रतनवाडी परिसरातही जोरदार वृष्टी झाल्याने धरणातील जलसाठा हजार २५५ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला, तर साेमवारी सायंकाळपर्यंत भंडारदरा ५० टक्के, तर मुळा धरण ४० टक्क्यांपेक्षा अधिक भरण्याची शक्यता आहे.

मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. तो दिवसभर कायम होता. त्यामुळे मुळा भंडारदरा धरणात प्रचंड वेगाने पाण्याची आवक सुरू होती. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने मुळा नदीला मोठा पूर आला. मुळा धरणात दिवसभर ३२ हजार २२० क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे मुळा धरणाचा जलसाठा सायंकाळपर्यंत हजार ६९३ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे रतनवाडी परिसरात जोरदार वृष्टी झाल्याने १२ तासांत सुमारे एक टीएमसी पाणी धरणात पोहोचले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे भंडारदरा, घाटघर, रतनवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भातरोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील ओढेनाले, तसेच सर्व धबधबे ओसंडून वहात आहेत. पाच-सहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावला होता. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. परंतु मागील तीन दिवसांपासून मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार वृष्टी झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून खऱ्या अर्थाने चिरपरिचित पाऊस सुरू झाल्याची प्रतिक्रिया आदिवासी शेतकरी व्यक्त करत आहेत. भंडारदरा परिसरात चोवीस तासांत तब्बल ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटघर, साम्रद, रतनवाडी उडदावणे, पांजरे येथे त्याच्या दुपटीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे १२ तासांत भंडारदरा धरणात ९२१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणातही या पावसाळ्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. रविवारी निळवंडे धरणाचा जलसाठा एक हजार ३७२ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. पावसाचा जोर असाच राहिला, तर सोमवारी सायंकाळपर्यंत भंडारदरा ५० टक्के, तर मुळा ४० टक्क्यांपेक्षा अधिक भरण्याची शक्यता आहे.

विद्युतगृहासाठी पाणी सोडले
मुळाभंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे निश्चिंत होऊन विद्युतगृहासाठी ५१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. त्यातून १२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू होऊन हे पाणी पुन्हा नदीत जात आहे. निळवंडे धरणात वाकी कृष्णावंती नदीतून पाण्याची आवक सुरू आहे.

नगरमध्येही सरी...
नगर शहरात रविवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. िदवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे रस्त्यांवर िचखलाचे साम्राज्य िनर्माण झाले असून त्यामुळे वाहनचालक पादचाऱ्यांचे हाल होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...