आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा व फळबागांना पावसाचा फटका; कोट्यवधींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला असला, तरी कांदा, कपाशी व फळबागांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु केले आहेत.
मागील शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. शनिवारी सकाळीही संततधार सुरू होती. सोमवारी दुपारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे नोंदवला गेला. अकोले तालुक्यात पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले. चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. पावसामुळे फळबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात १० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस - अकोले ७४० मिलिमीटर, श्रीगोंदे ३२५, कर्जत ३९१, जामखेड ४८८, श्रीरामपूर ५९४, राहुरी ४१७, राहाता ३८७, नेवासे ४१७, नगर ४९४, पाथर्डी ४७४, शेवगाव ४२७, पारनेर २२६, संगमनेर ४३१.

पालेभाज्या स्वस्त होणार
पावसामुळे पालेभाज्या स्वस्त होतील. दिवाळीत भाज्या महागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस पालक, मेथी, कोथिंबीर, शेपूसह अन्य भाज्यांना उपयुक्त ठरला आहे. येत्या काही दिवसांत भाज्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, असा अंदाज आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस
अकोले ३, संगमनेर १४, कोपरगाव ४, श्रीरामपूर १४, राहुरी ३३, नेवासे ११, राहाता ९, नगर २१, शेवगाव ५, पाथर्डी १५, पारनेर १८, कर्जत १७, श्रीगोंदे १९ व जामखेड ५ मिलिमीटर.