आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: दक्षिण जिल्ह्याला पावसाने झोडपले, 12 तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वृष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरासह दक्षिण जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत प्रथमच सरासरीपेक्षा ८६ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. 
 
दमदार पावसामुळे यंदा खरिपाच्या तब्बल पाच लाख दहा हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. जुलैत पाऊस झाल्यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर होती. मात्र, ऑगस्टमधील पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दक्षिण भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १९ मिलिमीटर पावसाची नांेद झाली. संगमनेर १२, श्रीरामपूर १०, राहाता ५३, नगर ३९, पारनेर ४६, कर्जत १८, श्रीगोंदे ६२ जामखेड येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

मागील पाच वर्षात यंदा प्रथमच सरासरीपेक्षा ८६ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची पावसाची सरासरी ४९७ मिलिमीटर आहे. यंदा ५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही भागात पावसामुळे कांद्याचे भाजीपाल्याचे नुकसान झाले. दमदार पावसामुळे विहिरी, छोटे-मोठे तलाव, बंधारे भरले आहेत. त्यामुळे यंदा टँकरवर होणारा खर्च कमी होणार आहे. 
 
जिल्ह्यातील बारा तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अकोले १६५, श्रीरामपूर १००.४५, राहुरी १०१.७७ , नेवासे १२५.७३, राहाता १३८.३५ , नगर १११, शेवगाव ११२, पाथर्डी १०१, पारनेर ११६, कर्जत १३९ , श्रीगोंदे १२९ जामखेड तालुक्यात १२१ टक्के पाऊस झाला. 

सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात ७९ टक्के संगमनेर तालुक्यात ९३ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी अकोले वगळता अन्य तेरा तालुक्यांत ९० टक्केच पाऊस झाला होता. गेल्या वर्षी पारनेर तालुक्यात सर्वांत कमी २६ टक्के पाऊस झाला होता. यंदा या तालुक्यात ११६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी नेवासे तालुक्यात ४९ टक्के पाऊस झाला होता. यंदा या तालुक्यात १२५ टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार आहे. 
 
नगर तालुक्यात ३९ मिलिमीटर पाऊस 
गेल्या२४ तासांत नगर तालुक्यात ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नालेगाव ३९, जेऊर ४, रुईछत्तीशी १२, कापूरवाडी ३२, केडगाव २८, चास ४५, भिंगार ४०, नागापूर ३४, वाळकी ९, चिंचाेडी पाटील सावेडी परिसरात ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे डोंगरगण परिसरात धबधबे कोसळू लागले आहेत. 
नगर शहरात गुरुवारी रात्री शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. 
 
मुळा धरणात ८६ टक्के साठा 
पावसामुळे भंडारदरा, आढळा सीना धरण शंभर टक्के भरले आहे. मुळा धरण ८६ टक्के भरले आहे. निळवंडे धरण ९८.३९ टक्के भरले आहे. मांडअाेहोळ ७० टक्के, घोड ९६ टक्के, तर खैरी ९५ टक्के भरले आहे. प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील छोटे-मोठे बंधारे, तलावदेखील भरले आहेत. जलयुक्त योजनेतून तयार करण्यात आलेले नवीन बंधारेही भरुन वहात आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...