आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढलेे. श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदे आणि जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले दुथडी भरुन वहात आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४७.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागातील पिकांचे या पावसाने मोठे नुकसान झाले. पावसाचा जोर कमी होताच नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून करण्यात येतील.
घटस्थापनेपासून जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत प्रथमच पावसाने सरासरी आेलांडली. शनिवारपासून सुरू असलेला पाऊस रविवारी सोमवारीही कायम होता. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नद्या, तलावे, बंधारे, तसेच चाऱ्या भरुन वहात आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील विहिरी भरल्या आहेत. सीना तिच्या उपनद्या सध्या दुथडी भरून वहात आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड श्रीगोंदे या तालुक्यांत पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६४९.४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक हजार १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमनेर ४८४, कोपरगाव ५११, श्रीरामपूर ७९३, राहुरी ६१६, नेवासे ५१५, राहाता ४६१, नगर ५९०, शेवगाव ८२२, पाथर्डी ७७६, पारनेर ३२६, कर्जत ७०१, श्रीगोंदे ५८५ जामखेड येथे ७४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल राहुरी तालुक्यात ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस थांबताच महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचे पिकांचे पंचनामे केले जातील.

कर्जत तालुक्यात नद्यांना पूर
कर्जततालुक्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलाव, ओढे, नाले, नद्या सध्या ओसंडून वहात अाहेत. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात आली होती. परतीच्या पावसामुळे त्यांना जीवदान मिळाले.

दोन तासांत भरले ३२ बंधारे
शनिवारीअवघ्या तासांत झालेल्या पावसाने नगर तालुक्यात लोकसहभागातून बांधण्यात आलेले गुंडेगाव पॅटर्नचे तब्बल ३२ साखळी बंधारे, पाझर तलाव, समतल चर ओसंडून वाहू लागले. कापूरवाडी तलावाची पातळीही वाढली आहे.

२४ तासांत झालेला पाऊस
गेल्या २४ तासांत अकोले ९, संगमनेर १८, कोपरगाव ४७, श्रीरामपूर १३०, राहुरी ८६, नेवासे ३४, राहाता ३१, नगर ४७, शेवगाव ७४,पाथर्डी ५३, पारनेर ४३, कर्जत ३८, श्रीगोंदे २६ जामखेड येथे २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुळा धरणाचा विसर्ग वाढवला
मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला अाहे. सध्या हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. सव्वीस हजार टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात सध्या २५ हजार ९७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.
बातम्या आणखी आहेत...