आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरात जड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी "जैसे थे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रवेशबंदी असलेल्या वेळेत अजूनही अवजड वाहने शहरात बिनदिक्कत प्रवेश करीत आहेत. अवजड वाहतूक शहराबाहेरुन वळवण्यासाठी बांधलेल्या बाह्यवळण रस्त्यांची अवस्था उत्तम झाली आहे. तरीही अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. एकीकडे शहरात नाकाबंदीची मोहीम सुरू असताना अवजड वाहनांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक शाखेकडून कारवाईत दुजाभाव होत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा मात्र तसाच आहे.
सकाळी ते १२, तसेच सायंकाळी ते रात्री या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी आहे. या वेळेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिकही कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशा वेळी अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे आजवर शहरात अनेक अपघात झाले असून निष्पापांचे बळी गेले आहेत. अशा अपघातांना आळा बसावा, वाहतूक कोंडी आटोक्यात यावी, माजी जिल्हाधिकाऱ्यांनी ठराविक कालावधीत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असल्याची अधिसूचना काढली होती.

ठराविक वेळेत असलेल्या प्रवेशबंदीबाबत सर्व महामार्गांवर फलकही लावलेले आहेत. परंतु, अधिसूचनेचे पालन करता अवजड वाहने शहरात प्रवेश करतात. सोलापूर पुणे महामार्गावरून, मनमाड रस्त्यावरून, औरंगाबाद रस्त्यावरून, तसेच कल्याण महामार्गावरून अवजड वाहने शहरात येतात. महामार्गाला जोडणाऱ्या बायपास चौकांत हायवे पोलिसांनी अवजड वाहनांना अडवून बायपासने मार्गक्रमण करण्याची सूचना करणे अपेक्षित आहे. परंतु, अशा चौकांमध्ये महामार्ग पोलिस थांबतच नाहीत.
ही जबाबदारी मध्यंतरी शहर वाहतूक शाखा सांभाळत होती. पण, मनुष्यबळाअभावी आता वाहतूक शाखेलाही या चौकांत पोलिस नेमणे शक्य नाही. त्यामुळे अवजड वाहने बायपासने जाण्याऐवजी शहरातूनच जात आहेत. अवजड वाहनांनी प्रवेशबंदी असलेल्या वेळेत शहरात प्रवेश केल्यास वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या नाकाबंदी कारवाईची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. परंतु, अवजड वाहनांवर मात्र कारवाई होत नाही. प्रवेशबंदी असलेल्या वेळेत अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केला, तर वाहन चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आता होत आहे.

एसपी चौकात पोलिसांनी मोटारसायकलींवर कारवाई केली. मात्र अवजड वाहनांना शहरात बंदी असतानाही वाहतूक पोलिसांसमोर अवजड वाहने शहरात प्रवेश करत होती. छाया: कल्पक हतवळणे

शहर वाहतूक पोलिसांचे अवजड वाहनांकडे दुर्लक्ष

सोमवारी सकाळी वाहतूक शाखेची पोलिस अधीक्षक चौकात नाकाबंदी कारवाई सुरू होती. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस मोटारसायकलस्वारांना अडवून कागदपत्रांची तपासणी करीत होते. मात्र, या पोलिसांसमोरुन शहरात अवैधरित्या प्रवेश केलेली अवजड वाहने सर्रासपणे पुढे मार्गक्रमण करीत होती. अवजड वाहने पोलिसांनी तपासणीकरिता अडवलेली वाहने, यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. या दुजाभावामुळे नागरिकांमध्ये मात्र संताप व्यक्त होत होता.