आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनांना शहरात कायमची "नो एंट्री'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, अवजड वाहनांची रहदारी यामुळे शहराचा कोंडलेला श्वास आता मोठ्या प्रमाणात मोकळा होणार आहे. शहरातून मार्गक्रमण करणारी अवजड वाहतूक आता कायमस्वरूपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ऑगस्टला ही अधिसूचना काढली आहे. शिवाय एमआयडीसी बाजारपेठेत येणाऱ्या अवजड वाहनांना यापुढे सकाळी ते रात्री १० या वेळेत शहरात प्रवेशबंदी असणार आहे. रात्री १० नंतर मात्र त्यांना शहरात प्रवेश करता येईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे दैनिक दिव्य मराठीने अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणारी समस्या सोडवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात १८ जूनला एक बैठक झाली होती. बैठकीला अतिरक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक निरीक्षक अरविंद भोळे, राज्य परिवहन विभागाचे नियंत्रक एस. टी. संवत्सरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता साळुंके, महामार्ग पोलिस विभागाचे सहायक निरीक्षक रणजित गलांडे आदी अधिकारी उपस्थित होते. शहरातील १३ अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा, खासगी बससाठी शहराबाहेर थांबे देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत झाली होती.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक देशमुख यांनी या बैठकीत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्याबाबत विनंती केली होती. तसे लेखी पत्रही त्यांनी २७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे आधीच्या अधिसूचनेत काही महत्त्वाचे फेरबदल करत जिल्हाधिकारी कवडे यांनी नवी अधिसूचना काढली. यापूर्वी सकाळी ते १२ सायंकाळी ते पर्यंत शहराच्या हद्दीतून अवजड वाहतुकीला प्रवेशबंदी होती. तशी अधिसूचना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती. आता मात्र कायमस्वरूपी शहराच्या हद्दीतून जड वाहतूक वळवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, खासगी बसेस, सातत्याने होणाऱ्या अपघातांचे मुद्दे यादृष्टीने या अधिसूचनेला विशेष महत्त्व आहे. खासगी बस शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या आसपास थांबतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. खासगी बसला शहर हद्दीबाहेर थांबा देण्याचाही निर्णय झालेला आहे. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. बाह्यवळण रस्त्याच्या चौकात हायमॅक्स दिवे, शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर झेब्रा क्रॉसिंगचा निर्णय झालेला आहे. या निर्णयाचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
"त्या' वाहतुकीचा प्रश्न कायम
सोलापूररोड पुणे रोड यांना जोडणाऱ्या वाळुंज-अरणगाव-केडगाव या बाह्यवळणाचे काम मात्र अद्यापही प्रगतfपथावर आहे. या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरहून पुण्याकडे पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने पूर्णपणे बाह्यवळण रस्त्याने वळवली जातील. तूर्तास ही वाहने शहरातूनच जाणार आहेत. शिवाय मनमाडहून सोलापूरकडे जाणारी अवजड वाहतूक अद्यापही निंबळक ते शेंडी बायपासमार्गे नगर शहरातूनच जात आहे. या वाहनांना यापूर्वीच ठरावीक वेळेसाठी शहरात प्रवेशबंदी केलेली आहे. मात्र, तरीही बंदी झुगारून ही अवजड वाहने बिनदिक्कत शहरात प्रवेश करीतच आहेत.

नव्या अधिसूचनेतील सुधारणा
औरंगाबाद,मनमाड या शहरांकडून पुणे कल्याणकडे जाणारी अवजड वाहने शेंडी-निंबळक-केडगाव बायपासमार्गे पुणे कल्याण शहराकडे वळवली आहेत. पुण्याहून मनमाड औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहने केडगाव-निंबळक-शेंडीमार्गे मनमाड औरंगाबादकडे वळवली आहेत. यापूर्वी शहरात ठरावीक वेळेतच प्रवेश करण्यास मनाई होती. आता मात्र, नवी अधिसूचना २४ तास लागू असेल. त्यामुळे वरील मार्गांवरून शहरात कायमची प्रवेशबंदी झालेली आहे. शिवाय शहराच्या हद्दीत कोणत्याही सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या आजूबाजूला अवजड वाहनांना उभे करण्यास प्रतिबंध केलेला आहे.

आता जबाबदारी पोलिसांची
शहरातीलवाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूक पूर्णपणे बाह्यवळण रस्त्याने वळवणे अपेक्षित होते. यापूर्वी ठरावीक वेळेपुरतीच प्रवेशबंदी होती. त्यामुळे वाहतूक महामार्ग पोलिसांची नजर चुकवून ही अवजड वाहतूक शहरातून जात होती. आता मात्र अवजड वाहतुकीला शहरात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर ही बंदी झुगारून अवजड वाहने शहरात आली, तर अशा वाहनांवर दंडात्मक तसेच गुन्हे नोंदवण्याची कारवाई वाहतूक महामार्ग पोलिसांना करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

तेरा ठिकाणी सक्तीचा ब्रेक
शहरातील१३ अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधके बसवण्याचा निर्णय झालेला आहे. केडगाव बाह्यवळण रस्ता चौक, केडगाव वेस, कायनेटिक चौक, सक्कर चौक, कोठी चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय चौक, शेंडी बाह्यवळण रस्ता चौक, तारकपूर भागातून टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता, झोपडी कॅन्टीन, सावेडीनाका, परिचय हॉटेलजवळ, नगर-कल्याण महामार्गावर नेप्ती शिवारात बाह्यवळण रस्ता चौक, जामखेड रस्त्यावर एसटी डेपो चौकात, आता गतिरोधक बसवले जातील. बाह्यवळण रस्त्यावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी केेडगाव, विळदघाट येथील चौकात रबर स्ट्रीप बसवले जातील. यापैकी काही गतिरोधके नुकतीच बसवली आहेत.