आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३३ कोटी २८ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँकखात्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खरिपाची शासकीय मदत शेतकऱ्यांच्या बँकखात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली अाहे. २७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १०५ गावांमधील ४६ हजार १२७ शेतकऱ्यांच्या बँकखात्यात ३३ कोटी २८ लाख ८६ हजार रुपयांची मदत वर्ग करण्यात आली. अकोले पाथर्डी तालुक्यात मात्र मदत वाटपास अजून सुरुवात झालेली नाही.
गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र लाख १२ हजार हेक्टर आहे. सन २०१४ मध्ये केवळ लाख ८७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. पावसाअभावी ही पिकेही जळून गेली. २०१५ मध्ये खरीप हंगामात लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली होती.
पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाने पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. खरिपाच्या नुकसान भरपाईपोटी प्रशासनाने सरकारकडे २७८ कोटींची मागणी केली होती. जिल्ह्यातील ५८१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने ही गावे सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली. सरकारने १६७ कोटी ६० लाखांच्या नुकसान भरपाईस मान्यता दिली. दोन आठवड्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील ९३ कोटी ७० लाखांची मदत प्रशासनाला मिळाली.

अकोले तालुक्यातील १९१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील १७१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. कमी पावसामुळे खरिपातील लाख ३३ हजार ५७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची झळ लाख ३८ हजार ९७० शेतकऱ्यांना बसली. पहिल्या टप्प्यात ९३ कोटी ६९ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली. त्यापैकी ३३ कोटी २८ लाख ८६ हजार १८५ रुपयांची मदत १०५ शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा झाली आहे. बुधवार अखेरपर्यंत ४६ हजार १२७ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली आहे. आतापर्यंत नगर, नेवासे, राहुरी, राहाता पारनेर तालुक्यात मदतीचे शंभर टक्के वाटप पूर्ण झाले आहे. सर्वाधिक खरिपाचे नुकसान झालेल्या अकोले तालुक्यात मात्र अजून मदतीचे वाटप सुरू झालेले नाही. पाथर्डी तालुक्यातही अजून मदत वाटपास सुरुवात झालेली नाही.

शेतकऱ्यांना तालुकानिहाय मदत
नगर : हजार ५५३ - कोटी २० लाख
नेवासे : हजार - कोटी ७७ लाख २३ हजार
राहुरी : हजार ५०७ - कोटी लाख ५० हजार
राहाता : हजार ३१० - कोटी ७८ लाख ५१ हजार
संगमनेर : हजार ३८४ - कोटी ४५ लाख ९२ हजार
शेवगाव : हजार ५१७ - कोटी २५ लाख ९८ हजार
पारनेर : १४ हजार ५७४ - १० कोटी ७९ लाख ७० हजार
कोपरगाव : हजार २७६ - कोटी ९८ लाख

कोरडवाहूसाठी हेक्टरी ६,८००
कमी पावसामुळे खरीप हंगामात कोरडवाहू क्षेत्रावरील बाधित शेतकऱ्यांची संख्या लाख ५५ हजार २२४ आहे. सिंचनाखालील बाधित शेतकरी संख्या हजार ९१५ आहे. फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २२ हजार ३२१ आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी हजार ८०० रुपये, फळबागासाठी हेक्टरी १८ हजार बागायती क्षेत्रातील पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत दिली जात आहे.