आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तूशांतीचा खर्च टाळून अपंगांसाठी 9 हजारांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गरिबीत दिवस काढून वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय करणारे व नुकतेच नवीन घर बांधणार्‍या पठारे कुटुंबाने वास्तूशांतीचा खर्च टाळून अपंग मुलांसाठी नऊ हजारांची मदत दिली आहे. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नवीन घराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अनेकजण वास्तूशांतीसाठी हजारो रुपयांचा खर्च करतात. मात्र, पाइपलाइन रस्त्यावरील अमित पठारे या वृत्तपत्र विक्रेत्याने प्रदीर्घ काळानंतर मोठय़ा कष्टाने छोटेसे घर बांधले. परंतु गरिबी काय आहे, याचा अनुभव असलेल्या पठारे यांनी वास्तूशांती न करता केवळ सत्यनारायण पूजा करून गृहप्रवेश केला. वास्तूशांतीच्या खर्चाची रक्कम त्यांनी अपंग मुलांसाठी देऊन समाजात नवा आदर्श निर्माण केला.

अपंग मुलांचा सांभाळ करणार्‍या प्रदीप चौधरी यांना 5 हजार 500 रुपये, तर सावली संकुलातील अनाथ बालकांसाठी 3 हजार 333 रुपयांची मदत पठारे यांनी केली. यावेळी माजी महापौर संग्राम जगताप, अविनाश घुले, संजय घुले, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सुनील गिते, पठारे कुटुंबातील अशोक पठारे, चंद्रकांत पठारे, सुनील पठारे, विजय मते, सुनील जोशी, बाबा दुसुंगे, राहुल लिमये, शरद बेरड आदी उपस्थित होते.