आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी भाजपची मदतफेरी, दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली निधी संकलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुरामुळे बेघर झालेल्या काश्मीरमधील नागरिकांसाठी भाजपच्या वतीने मदतफेरी काढण्यात आली. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शहरातून फेरी काढली.

भिंगारवाला चौकातून फेरीला सुरुवात झाली. यावेळी खासदार दिलीप गांधी, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी, श्रीकांत साठे, महिला जिल्हाध्यक्ष गीता गिल्डा, छाया दिवाणे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, महेश तवले, दत्ता कावरे, किशोर बोरा, प्रशांत मुथा, पवन गांधी, गोपाळ वर्मा, अनंत जोशी, तुषार पोटे, पियुष जग्गी, सागर कराळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या वाढदिवसाचा डामडौल टाळून काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.
त्यामुळे आज आयोजित केलेले विविध कार्यक्रम रद्द करुन काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता शहरात निधी संकलन सुरू केले आहे. शहरातील प्रत्येक भागात जाऊन जास्तीत जास्त मदतनिधी संकलित करण्यात येणार आहे. संकलन झालेला निधी नगर अर्बन बँकेच्या वतीने लाखांचा निधी मोदी यांची भेट घेऊन सुपूर्द केला जाईल. अ‍ॅड. आगरकर म्हणाले, मदतनिधीसाठी शहरातील व्यापारी, नागरिक सर्वसामान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील सर्वांनी सढळ हाताने मदत केली आहे.

काश्मीरमधील पूरग्रस्त निधीसाठी फळविक्रेत्या महिलेनेही मदत देऊ केली. छाया : सिद्धार्थ दीक्षित