आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा नगरचा: कापूरवाडीचा तलाव, वटराई, राडसबा महाल आणि दिवाणे आम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गर्भगिरीच्या डोंगररांगेमागून वर येणारा सोन्याचा गोळा, त्याच्या प्रभावळीनं उजळणारं पूर्वेकडचं आकाश, कापूरवाडीच्या तलावात दिसू लागलेलं चांदबिबी महालाचं प्रतिबिंब अशा सुरेख वातावरणात रविवारी भल्या सकाळी ‘हेरिटेज वॉक’ला सुरूवात झाली. 

नगरच्या किल्ल्याला आणि शहराला एकेकाळी पाणी पुरवणारा कापूरवाडीचा तलाव आता दुर्लक्षित झाला असला, तरी तिथली चारशे-पाचशे वर्षे जुनी असलेली वडांची झाडं आणि पक्ष्यांचं कूजन मनाला भुरळ घालतं. बुऱ्हाणनगरजवळ असलेली निजामशाही काळातील बारवही अजून भक्कम आहे. वाघ हत्तीचं शिल्प आणि तिथले खापरी नळ त्या काळाची आठवण करून देतात. कंुपण करून ही बारव हगणदारीमुक्त केली, तर उत्तम पर्यटनस्थळ होऊ शकतं, असं अनेकांनी यावळी बोलून दाखवलं. 

कापूरवाडी तलावाच्या बरच्या बाजूला जुन्या पाणी योजनेची ‘डिस्ट्रीब्युशन वेल’ आहे. डोंगरातील ओहोळ एकत्र करून आणलेलं पाणी तिथं साठवलं जायचं आणि तिथून ते तीन दिशांना वितरीत केलं जायचं. जगात फार कमी ठिकाणी अशी पद्धत वापरली जात असे. ही विहीर बघितल्यानंतर सगळेजण पोहोचले देवगाव घाटाच्या वर असलेल्या राडसबा महालात. पूर्वी टेहळणी आणि संदेशवहनासाठी वापरली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आकाराने छोटी असली, तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

डोंगरवर उभ्या असलेल्या दीडशेहून अधिक पवनचक्क्या अहोरात्र वीज कशी तयार करतात, हे पाहण्याची संधीही ‘स्वागत अहमदनगर’ आयोजित या हेरिटेज वॉकमध्ये मिळाली. अभियंता श्रीकांत वैराळकर यांनी पवनचक्क्यांचं अंतरंग उलगडून दाखवलं. या भटकंतीची सांगता भुईकोट किल्ल्यातील नेता कक्ष, बारूदखाना, दिवाणे आम, दिवाणे खासच्या दर्शनानं झाली. दिवाणे आमच्या छतावरील अप्रतिम नक्षीकाम पाहून सगळे अवाक झाले. 

अफवा वस्तुस्थिती 
पवनचक्क्याउभारताना केवळ भारतात नव्हे, तर पुढारलेल्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांत प्रारंभी विरोध झाला. काहींनी पवनचक्क्यांमुळे वारा अडून पाऊस कमी होतो अशा कंड्या पिकवल्या, तर काहींनी खूप पाऊस पडून आमच्या पिकांचं नुकसान झालं, अशी आवई उठवली. काहींनी पवनचक्क्यांमुळे आम्हाला खूप थंडी वाजते, पंखा फिरवायचं थांबवा, अशी तक्रार केली. अर्थात या सगळ्यामागे ‘अर्थकारण’चं होतं, हे नंतर स्पष्ट झालं. 
बातम्या आणखी आहेत...