आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२६ जानेवारीपर्यंत विशाखापट्टणम महामार्ग पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भिंगारच्या विकासाला सुरुवात होणार आहे. २०१३ पासून या रस्त्याच्या मंजुरीकरिता मी पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरवर मोठी कृपादृष्टी ठेवून हा महामार्ग, तसेच रिंग रोडकरिता मोठा निधी दिला. २६ जानेवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
कल्याण-विशाखापट्टणम महामार्गांतर्गत स्टेट बँक चौक-भिंगार-शहापूर रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणाचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खासदार गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, कॅन्टोंमेंट बोर्ड सदस्य शुभांगी साठे, मीना मेहतानी, रवी लालबोंद्रे, प्रकाश फुलारी, संजय छजलानी, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, श्रीकांत साठे, किशोर बोरा, सुनील पंडित, प्रमोद मुळे, दामोदर माखिजा, गणेश साठे, सुभाष पाटील, कन्हय्या गिलशेर आदी उपस्थित होते.

महापौर कदम म्हणाल्या, भिंगारच्या वैभवात भर घालणारे हे काम असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. गांधींच्या सहकार्याने शहराच्या विकासाकरिता केंद्र राज्य सरकारच्या योजना नगर शहरात प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
छिंदम म्हणाले, खासदार गांधी यांनी नगर शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याने सर्व महामार्ग प्रशस्त होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करुन मूलभूत सोयी सुविधा देणार आहोत. प्रास्ताविकात भिंगार भाजपचे माजी अध्यक्ष वसंत राठोड म्हणाले, भिंगार शहरातील समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाकरिता यापूर्वी अनेकवेळा आंदोलने केली. खासदार गांधी यांच्याकडे वारंवार पाठपुरवठा केला. भिंगार शहरातून जाणारा हा रस्ता प्रशस्त होणार असल्याने भिंगारचे रुप बदलणार आहे. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...