आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी हवा कठोर कायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
नगर- चौपदरीमहामार्गांचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी अॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी केली. चौपदरी महामार्गांवर उलट दिशेने वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अॅड. सुद्रिक यांनी ही मागणी केली आहे.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सुद्रिक यांनी कायद्याचा आग्रह धरला आहे. या कायद्यामध्ये आवश्यक असलेल्या तरतुदींकरिता काही मुद्देही अॅड. सुद्रिक यांनी सुचवले आहेत. चौपदरी महामार्गावर यू टर्न दूर अंतरावर असल्यास काही चालक सर्रास उलट दिशेने वाहन चालवतात.

सर्व नियम तोडणाऱ्या अशा वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा अपघातात बळी पडलेल्या जखमी मृताला दुप्पट नुकसान भरपाई द्यावी. ही भरपाई वाहनाच्या मालक चालकाकडून वसूल करावी. तसेच उलट दिशेने वाहन चालत असल्यास अपघात झाला, तर त्यातील चालक प्रवाशाला कोणतीही भरपाई देऊ नये, अशा चालकाचा परवाना रद्द करावा. त्याच्यावरील दंडाची रक्कम वाढवावी, अशा सूचना अॅड. सुद्रिक यांनी सुचवल्या आहेत.
सुद्रिक यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे बालगुन्हेगार कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन कायद्यात बदल करण्यात आला. खरेदीखत दस्त नोंदवताना मूळ मालकांऐवजी बोगस व्यक्तींना उभे केले जात असे. त्यामुळे खरेदी करणारा मूळ मालकाची फसवणूक होते. याबाबत अॅड. सुद्रिक यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाने संबंधित खाते सरकारला नोटीस बजावून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. आता चौपदरी वाहन कायद्यात बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...