आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैतिक मूल्यांचा अभ्यास करून मुलांना धार्मिक शिकवण द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आई-वडिलांनी आपली हिंदू संस्कृती जपली, तरच भावी पिढी चांगली निर्माण होईल. नैतिक मूल्यांचा अभ्यास करून हिंदू धर्माची शिकवण मुलांना दिल्यास त्यांचे जीवन अधिक आनंददायी होईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
पाइपलाइन रस्त्यावरील श्रीजय तुळजाभवानी माता मंदिराच्या वतीने विजयादशमीनिमित्त हिंदू धर्मसभा झाली. मंदिराच्या वतीने दिला जाणारा धर्मात्मा पुरस्कार उद्योजक रविराज पाटील यांना महापौर सुरेखा कदम अॅड. रामतीर्थकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रामतीर्थकर यांचे ‘गोंधळ अंबेचा जागर हिंदुत्वाचा’ या विषयावर व्याख्यान झाले. नैतिक मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे. मुलांना गीता रामायणाची महती पटवून द्या. हिंदू धर्मातील विविध सणांत व्यसने करून सण साजरे करण्याचे प्रमाण लक्षणीय असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या सर्वच कार्यक्रमांना नगरकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिराचे संस्थापक अशोक कानडे, अंजली देवकर, सोनाली गावडे, चारूमती पाटील, वसुमती कुलकर्णी, स्मिता शितोळे, मंगल रांगोळे, आशा काळे, स्नेहल होशिंग, वैशाली दंडवते, शिवाजी चव्हाण, प्रमोद कांबळे, प्रा. सीताराम काकडे, भालेराव, ओमप्रकाश तिवारी, आंधळे आदी उपस्थित होते. रावणाचे दहन ईश्वरी वाळके, सानिया कानडे, स्वराली काकडे, अनिषा बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
कानडे म्हणाले, तुळजाभवानी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नित्यनियमाने येणाऱ्याची संख्या मोठी आहे. हिंदू सण, उत्सव आम्ही नेहमीच साजरे करतो. समाजाला प्रेरणा देणारे काम आम्ही करत आहोत. सर्वांच्या सहकार्यातून उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करू शकतो. यापुढील काळातही समाजहिताचे कार्यक्रम घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...