आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी; पुस्तकावर बंदीची हिंदू जनजागरण समितीची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या ‘छत्रपती शिवाजी : द वॉरिअर हू वन बॅक लॉस्ट प्राईड अँण्ड ऑनर ऑफ हिंदूज’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीचे पदाधिकारी संदीप खामकर यांनी बुधवारी केली.

पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इतिहासाचा अभ्यास न करता, तसेच इतिहासाचा काडीमात्र संबंध नसताना हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकात शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला आहे. दिल्ली येथील इगेन बी यांनी हे पुस्तक लिहिले असून मनोज प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. भारतात इंग्रजांचे राज्य येण्यास शहाजीराजे जबाबदार असल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. छत्रपती राजाराम यांच्या आई सोयराबाई यांचा उल्लेख शोभाबाई असा करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे शिवरायांचे चुकीचे चरित्र वाचकांच्या मनात रुजेल. पुस्तकामध्ये स्वैर कल्पनाविलास करण्यात येऊन खोटी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. हिंदू जनजागरण समितीचे तेजस भाले, परमेश्वर गायकवाड, अनिल देवराव, सचिन देवकर व सुनील घनवट आदी यावेळी उपस्थित होते.