आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू राष्ट्र सेनेची मिरवणूक निघालीच, पोलिसांचाकडेकोट बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीत गेल्या वर्षी दंगल उसळल्यामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी देण्याचा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला होता. तथापि, हो-नाही करता करता यंदाही विनापरवानगी मिरवणूक निघालीच. दाळमंडई येथून दुपारी तीनच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौपाटी कारंजा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. पोलिसांना कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे मिरवणुकीत अखेरपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे अखेरीस जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.

गेल्या वर्षी परवानगी नाकारुनही हिंदू राष्ट्र सेनेने श्रीरामनवमीला मिरवणूक काढली होती. माळीवाड्यातून निघालेली मिरवणूक आशा टॉकिज चौकात आल्यानंतर घोषणाबाजी झाल्याने त्यावेळी मिरवणुकीत दंगल उसळली होती. दंगलीमुळे गेल्या वर्षीच्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी पोलिस प्रशासनाने मिरवणुकीला परवानगीच देण्याची भूमिका घेतली होती. तरीही यंदा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामनवमीची मिरवणूक निघालीच. ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको, म्हणून पोलिसांनीही विरोध केला नाही. उलट कडेकोट बंदोबस्तात ही मिरवणूक निघाली.
गुरुवारी रात्रीपासून सोशल मीडियावर पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी दिल्याचे संदेश व्हायरल होत होते. त्यामुळे श्रीरामनवमी निमित्त शहरातून मोठी शोभायात्रा िनघणार असल्याचे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सांगण्यात आले. महिला पुरुषांना मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. परंतु वरिष्ठ पोलिस अधिका ऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास हिंदू राष्ट्र सेनेचा श्रीरामाचा रथ दाळमंडई परिसरात दाखल झाला अन् पोलिसांची कोणतीही परवानगी घेता मिरवणुकीला सुरुवात झाली.

दाळमंडईतून तेलीखुंट, तेथून पॉवर हाऊसमार्गे नेता सुभाष चौक, नंतर चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा परिसरात आल्यावर मिरवणुकीचा समारोप झाला. एका रथामध्ये सजावट करुन उभी केलेली श्रीरामाची मूर्ती हजारो कार्यकर्त्यांचा समावेश अशी मिरवणूक पुढे सरकत होती. मिरवणुकीत दोन साऊंड सिस्टिम स्पीकरचाही समावेश होता. श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. तेलीखुंट परिसरात आल्यानंतर मिरवणूक बराच वेळ रेंगाळली. सायंकाळी पाचच्या सुमारास नेता सुभाष चौकात आल्यावरही मिरवणुकीत श्रीरामाच्या जयघोष घोषणाबाजी झाली.

श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, कोतवालीचे पोलिस िनरीक्षक सोमनाथ मालकर, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद पाटील, तोफखान्याचे सहायक निरीक्षक राहुल गायकवाड, कोतवालीचे सहायक निरीक्षक संदीप पाटील आदी अधिकाऱ्यांसह मोेठा फौजफाटा मिरवणूक बंदाेबस्तात होता.

सिव्हिल हडकोतही उत्साह
सिव्हिलहडको परिसरात सिव्हिल हडको मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त मंदिर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांची झांज लेझीम पथके सहभागी झाली होती. सकाळी सात वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. टिपऱ्यांच्या साथीत परिसरातील महिलांनी फेर धरला. गणेश चौकात मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. दुपारी १२ वाजता शोभायात्रा दत्त मंदिरात पोहोचली. तेथे जन्मोत्सव सोहळा रंगला. शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सिव्हिल हडको मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबीरही घेण्यात आले. या िशबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.

खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती
पोलिसांनीपरवानगी नाकारलेली असूनही मिरवणुकीत ध्वनिक्षेपक यंत्रणेचा समावेश होता. कोतवाली पोलिसांनी मिरवणुकीत तीन वेळा ध्वनिमर्यादेचे नमुने घेतले. चौपाटी कारंजा परिसरात आल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती झाली. नंतर मिरवणुकीचा समारोप झाला. गेल्या दोन दिवसांपासून कोतवाली तोफखाना पोलिसांनी सुमारे ६० हून अधिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मात्र दोन्ही पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

शक्ति प्रदर्शनाचा प्रयत्न
भाजपनगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक निघाली. मिरवणुकीत हजारो युवकांचा सहभाग असल्याचे पोलिस ती अडवू शकले नाहीत. मिरवणूक नेता सुभाष चौकात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक विक्रम राठोड त्यात सहभागी झाले. राठोड गांधी समोरासमोर आल्यावर त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. हिंदू राष्ट्र सेनेने ही मिरवणूक रामनवमीची असून यात शक्तिप्रदर्शन टाळण्याचे आवाहन केले. नंतर तणाव निवळून मिरवणूक मार्गस्थ झाली.
महिलांनी फिरवली पाठ
सकाळीअकरा वाजता जुन्या वसंत टॉकिजपासून मिरवणुकीला सुरुवात होईल, असा संदेश हिंदू राष्ट्र सेनेच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुरुषांनी पांढरा शर्ट, पांढरी पँट भगवा फेटा किंवा भगवी टोपी परिधान करावी, असे आवाहन करण्यात आले होते. आपल्या घरातील महिलांनाही बरोबर घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष मिरवणुकीत मात्र महिलांचा समावेश नव्हता. मिरवणुकीत तरूणांची संख्या मात्र लक्षणीय होती. रामाची गाणी वाजवत मिरवणूक उत्साहात पुढे सरकत होती.
बातम्या आणखी आहेत...