आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historical Palaces News In Marathi, Nagar, Chandbibi Palace, Divya Marathi

एक सकाळ ऐतिहासिक वास्तूच्या सानिध्यात..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येत्या रविवारची सकाळ बागरोजा, तर 18 एप्रिलची संध्याकाळ चांदबिबी महालासाठी (सलाबतखान मकबरा) राखून ठेवा. नगरच्या वैभवशाली इतिहासात डोकवण्याची संधी यानिमित्ताने तुम्हाला मिळू शकेल.
‘जागतिक वारसा दिना’च्या निमित्ताने व्हर्सटाईल ग्रूपच्या वतीने यंदा या दोन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुले आहेत. पहिला कार्यक्रम होणार आहे, येत्या रविवारी (13 एप्रिल) सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीगेट हडको परिसरातील बागरोजा येथे. नगर शहराचे संस्थापक अहमद निजामशाहच्या चिरविर्शांतीचे हे स्थान. इतिहासप्रसिद्ध तालिकोटच्या लढाईचे स्मारकही तेथे आहे. याविषयीची माहिती उपस्थितांना दिली जाईल.
व्हर्सटाईल ग्रूपतर्फे गेले वर्षभर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेली मुले-मुली यावेळी आपले अनुभव सांगतील. प्रा. ज्ञानेश कुलकर्णी व कमलेश चंगेडे यांनी नगरवर तयार केलेल्या डॉक्युमेंटरी यावेळी दाखवण्यात येतील, अशी माहिती व्हर्सटाईल ग्रूपचे डॉ. महेश मुळे यांनी दिली. दुसरा कार्यक्रम 18 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता चांदबिबी महाल परिसरात होणार आहे. प्रारंभी हेरिटेज वॉक काढून नगरचा इतिहास कथन केला जाईल. नंतर डोंगरावरील वनखात्याच्या निसर्ग माहिती केंद्रात स्लाईड शो व आकाश दर्शनाचा कार्यक्रम होईल. दुर्बिणीतून मंगळ पाहण्याची संधी यावेळी उपस्थितांना मिळेल, अशी माहिती दत्ता देवगावकर यांनी दिली. या कार्यक्रमांत नगरकरांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी डॉ. मुळे 9822510725, पंकज मुनोत 9422081661, अनिरुद्ध बोपर्डीकर 9975773000, अमोल सांगळे 9623122151 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचे जागतिक घोषवाक्य ‘हेरिटेज ऑफ कॉमेमोरेशन..’
इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंटस् अँड साईटस (इकोमोस) संघटनेने 2014 च्या जागतिक वारसा दिनाचे घोषवाक्य ‘द हेरिटेज ऑफ कॉमेमोरेशन’ असे केले आहे. सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या वास्तू, स्थळांची आठवण जपत या वास्तू ज्यावेळी उभ्या राहिल्या, तेव्हाच्या घटनांचा मागोवा घेणे या दिवशी अपेक्षित आहे. त्या घटनांनी भूतकाळातील कोणत्या मार्गाने राष्ट्राला सन्मानाला नेले व वर्तमानात काय करावे म्हणजे भविष्यकाळ अधिक उन्नत व प्रगतीचा होईळ, याचा धांडोळा आपल्याला घ्यावयाचा आहे.’’ दत्ता देवगावकर, व्हर्सटाईल ग्रूप, अहमदनगर.