आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारची ऐतिहासिक वेस जमीनदोस्त होण्यापासून वाचली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगार येथील ऐतिहासिक वेशीवरील गंडांतर तूर्त टळले असले, तरी ही वेस पाडावी, अशी मागणी पुढे आली आहे. भिंगारची वेस पाडण्यात आली, तर नगर शहरातील माळीवाडा व दिल्ली दरवाजा या दोन वेशींचे अस्तित्वही धोक्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात भिंगार वेशीचा काही भाग ढासळला. वेस ढासळ्यानंतर काहीजणांनी वाहतुकीत अडथळा नको, म्हणून ही वेसच पाडून टाकावी, अशी मागणी केली. त्यामुळे कँन्टोन्मेंट बोर्डाने बुधवारी सकाळी जेसीबी आणून वेस पाडण्याचे काम सुरू झाले. तथापि, काहीजणांनी पुरातत्व विभागाचा मुद्दा उपस्थित करून वेस पाडण्यास विरोध केला. त्यामुळे जिल्हािधकारी अनिल कवडे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याबाबत आधी खातरजमा करण्यास सांगितले. त्यामुळे वेस पाडण्याचे काम थांबले.
या वेशीसमोरून कल्याण-विशाखापट्टणम्् राष्ट्रीय महामार्ग जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असून तेथील दुकानदारांनी मागे हटण्यास नकार दिला. अखेर आता महामार्गच भिंगारबाहेरून नेण्याचे ठरले. अतिक्रमणे काढल्यास या ऐतिहासिक वेशीचा वाहतुकीला कोणताही अडसर येणार नाही. त्यामुळे ती जमीनदोस्त करू नये, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे.

मूळ बांधकाम अजून भक्कम भिंगार वेशीचे मूळ बांधकाम भक्कम आहे. वरच्या बाजूला नव्याने जे बांधकाम करण्यात आले होते, ते चांगल्या पद्धतीने करण्यात आले नसल्याने त्यात पावसाचे पाणी साचून ते खराब झाले. नगर शहरातील माळीवाडा वेस व दिल्ली दरवाजा अजूनही भक्कम आहे. या वेशी पाडण्याचेही मध्यंतरी घाटत होते, पण त्याला मोठा विरोध झाला. पुरातत्व विभागाचे संरक्षण नसल्याने या वेशींकडे दुर्लक्ष होण्याबरोबर त्यांच्यावर अतिक्रमण होत आहे.