आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारची ऐतिहािसक वेस भुईसपाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसामुळे थोडी ढासळलेली ऐतिहािसक भिंगार वेस गुरुवारी मध्यरात्री पाडण्यात आली. जिल्हािधकारी अिनल कवडे यांच्या आदेशानुसार छावणी परिषदेने तातडीने ही कार्यवाही केली. पावसामुळे वेशीचा काही भाग मंगळवारी कोसळला होता. पुरातत्व विभागाकडे वेशीबाबत काहीच नोंद नव्हती. त्यामुळे धोकादायक इमारत समजून भिंगारचा हा ऐितहािसक ठेवा डोळ्यादेखत भुईसपाट झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

धोकादायक झालेली ही वेस पाडण्याबाबत भिंगार येथील सुनील पतके, प्रकाश लुिणया, अशोक जाधव, सुनील लालबोंद्रे आदींचे शिष्टमंडळ छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अिधकारी विलास पवार यांना भेटले होते. जिल्हािधकारी अिनल कवडे यांची परवानगी असेल, तर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. त्यानुसार शिष्टमंडळ जिल्हािधकारी कवडे यांना भेटले. त्यांनी पुरातत्व खात्याशी चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. पुरातत्व खात्याकडे वेशीच्या संरक्षणाबाबत कोणतीच नोंद नसल्याने कवडे यांनी वेस पाडण्याचे आदेश छावणी परिषदेला दिले. आदेश मिळताच पवार यांनी गुरुवारी मध्यरात्री वेस पाडण्याची कार्यवाही पूर्ण केली.

वेस पाडू नका, तिची डागडुजी करा, अशी मागणी पत्रकार प्रकाश भंडारे व काही इितहासप्रेमी ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवातीला केली होती. मात्र, जिल्हािधकारी कवडे यांचे आदेश मिळाल्याने वेस पाडण्यात आली. वेशीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. वेस पाडल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. इितहासप्रेमी नागरिकांनी मात्र वेस पाडल्यामुळे हळहळ व्यक्त केली.