आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Lover And Research Student Visit Bhuikot Fort At Nagar

प्रदर्शनाच्या निमित्ताने भुईकोट किल्ल्यात इतिहासप्रेमींची मांदियाळी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केवळनगर शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील आणि परगावच्या इतिहासप्रेमींनी येथील भुईकोट किल्ल्यात भरलेल्या प्रदर्शनाला हजेरी लावली. तीन दिवसांत पंधरा हजारांहून अधिक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले.
नगर शहराचे ५२५ वे स्थापना वर्ष, पंडित नेहरूंची १२५ वी जयंती आणि पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीनिमित्त नगर येथील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या वतीने किल्ल्यातील नेताकक्षाशेजारी आयोजित पहिल्या दुसऱ्या महायुद्धातील दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज चित्रांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पावसाळी वातावरण असूनही नगरकरांनी घराबाहेर पडून आपली रविवारची सुटी सत्कारणी लावली. प्रदर्शनाची वेळ सायंकाळी पाचपर्यंत होती. तथापि, त्यानंतरही अनेकजण येत होते. स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताकदिनी किल्ला परिसरात जसे यात्रेसारखे वातावरण असते, त्याची अनुभूती मागील तीन दिवसांत आली.

प्रदर्शनाचा समारोप चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. अशोक नेवासकर यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी झाले. प्रदर्शनासाठी ज्यांनी जर्मनीतून दस्तऐवज आणले ते डॉ. शशी धर्माधिकारी, नगरचे चित्रमय दर्शन घडवणारे योगेश हराळे यांच्यासह शब्बीर शेख, अरविंद कुडिया, पंकज मुनोत, अहमद चाचा, हरीश सागडे, अनिल मेहेर, संतोष यादव, नारायण आव्हाड सर्व स्वयंसेवकांचा सत्कार या वेळी करण्यात आला. प्रा. नेवासकर यांनी हे खरोखरीच ऐतिहासिक प्रदर्शन ठरले, असे सांगत संयोजकांचे कौतुक केले. संग्रहालयाच्या वतीने अशी प्रदर्शने यापुढील काळात भरवण्यात येतील, असे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांनी सांगितले. प्रास्ताविकात भूषण देशमुख यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका विशद करत जिल्हाधिकारी अनिल कवडे लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. अभीरक्षक संतोष यादव यांनी या उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. आभार सविता धर्माधिकारी यांनी मानले. सूत्रसंचालन प्राजक्ता सुरकुटला यांनी केले.
किल्ल्यात भटकंती
किल्ला फक्त २६ जानेवारी १५ ऑगस्टला पाहता येतो, असे अनेकांना वाटते. किल्ला लष्कराच्या ताब्यात असला तर तो पर्यटकांना पाहण्यासाठी वर्षभर सकाळी ते सायंकाळी या वेळात खुला असतो. या प्रदर्शनाची संधी साधून अनेकांनी किल्ल्याच्या तटबंदीवरून भटकंती करण्याचा आनंद घेतला. बुरूज, खंदक, महाल तसेच हत्ती दरवाजाला अनेकांनी भेट दिली.