आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरे बाजारचे उपक्रम पंजाबमध्ये! पंजाबच्या ग्रामविकास मंत्र्यांची नगरभेटीत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या हिवरे बाजारमधील आदर्श कामांची पाहणी करण्यासाठी रविवारी पंजाबचे ग्रामविकास मंत्री सिकंदर सिंग आले होते. लोकसहभागातून या गावात राबवलेल्या नावीन्यपूर्ण योजना पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. हिवरे बाजारमध्ये राबवलेले उपक्रम पंजाबमध्येही राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मंत्री सिंग यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री मंतर सिंग, आयुक्त जी. एस. घुमान यांनी हिवरे बाजारला भेट दिली. गावात राबवलेले विविध उपक्रम त्यातून झालेला विकास पाहून मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच पोपटराव पवार यांनी विकासकामांची माहिती दिली. नंतर चर्चा करताना सिंग म्हणाले, सरपंच पुढाकार घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण हिवरे बाजार आहे. येथे राबवलेले उपक्रम पंजाब राज्यात राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्त्री-पुरुषांची टीम हिवरे बाजारला भेट देणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी वामन कदम, तहसीलदार सुधीर पाटील, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे उपस्थित होते.