आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरेबाजार देशासाठी मॉडेल व्हिलेज: पंतप्रधान कार्यालयाचे सचिव डॉ. परदेशी यांचे गौरवोद्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी- हिवरेबाजार हे राज्यच नव्हे, तर देशासाठी आदर्श असे मॉडेल व्हिलेज आहे. जगभरात इस्त्राइलनंतर हिवरेबाजार हे वॉटर ऑडीटींगची संकल्पना राबवणारे गाव आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी काढले. 

डॉ. परदेशी हे कुटुंबासह हिवरेबाजार येथील ग्रामविकासाची पाहणी करण्यासाठी आले होते. गावात फिरून त्यांनी पाहणी केली. राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांंनी त्यांना माहिती दिली. नागरिकांशी संवाद साधताना डॉ. परदेशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टनुसार २०२२ पर्यंत सर्वांना घरे, ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे रस्त्याने जोडली जाणार आहेत. 

महात्मा गांधी रोहयोंतर्गत सर्वांना रोजगार नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात ३१ मे पर्यंत तूर खरेदी केली जाणार आहे. परदेशी यांनी गावात राबवल्या जाणाया विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांच्या हस्ते गावात ओपन जिमचेही उद््घाटन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...