आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळे पुरस्कारांचे उद्या सीएसआरडीत वितरण सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - डॉ. भा. पां. हिवाळे एज्युकेशन सोसायटी संचलित ग्रामीण विकास अध्ययन केंद्राच्या वतीने (सीएसआरडी) दिला जाणारे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे वितरण 13 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व राजन खान यांच्या उपस्थितीत सीएसआरडी येथे होणार आहे.

पुरस्कारांची घोषणा सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी केली. सन 2010-11 या वर्षीचे गद्य विभागातील पुरस्कार उषा खंदारे (महाराष्ट्र भूषण), चंद्रकांत म्हस्के (वादळझोत) व अंकुश गाजरे (अनवाणी), तर पद्य विभागातील पुरस्कार गणेश भगत (पन ती जपून ठेवा), मुकुंदराज कुलकर्णी (अनासक्त) व सुरेखा येवले (अंतरंग) यांनी मिळाले आहेत.

2011-12 या वर्षींचे गद्य पुरस्कार मंदा कदम (तुकयाली), अनुराधा ठाकूर (अनुभूतीच्या स्पंदनरेखा), सुखलाल चौधरी (दान पावलं देवाला), तर पद्य पुरस्कार प्रियंका डहाळे (अनावृत्त रेषा), लक्ष्मण बाराहाते (पाचबिगे) आणि चंद्रकांत कर्डक (माणसांच्या वाती) यांना जाहीर झाले आहेत. प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. फादर नेल्सन फालकाव यांच्या ‘ख्रिस्त पुराण’, अँड. एकनाथ आव्हाड यांचे ‘जग बदल घालुनी घाव’ व लहू कानडे यांच्या ‘तळ ढवळताना’ या पुस्तकांना या वेळी गौरवण्यात येणार आहे.

फादर फलकाव यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत डॉ. डी. एस. वाडकर, राजू इनामदार, रवींद्र सातपुते, नीलिमा बंडेलू, शर्मिला गोसावी, मेघा काळे यांचा समावेश होता.

पुरस्कार वितरण समारंभास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


ठाकूर यांचा गौरव
हिवाळे ग्रंथ पुरस्कार मिळालेल्या प्रसिद्ध चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचा समावेश असलेले ‘आर्ट फॉर रिलिफ’ हे प्रदर्शन नवी दिल्ली येथील आयफेक्स आर्ट गॅलरीत सध्या भरले आहे. या चित्रांची रक्कम केदारनाथ रिलीफ फंडासाठी दिली जाईल. बल्गेरियात होणार्‍या ‘वेकअफ युवर वॉल्स’ या प्रदर्शनातही ठाकूर यांची चित्रे असतील.

सृजन सोहळा..
हिवाळे दांपत्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी ग्रंथ साहित्य पुरस्कार दिले जातात. बदलत्या सामाजिक जीवनातील राजकीय, आर्थिक, तसेच सांस्कृतिक पैलूंच्या वास्तवावादी, तसेच संवेदनशील साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे, हा या पुरस्कारांमागील उद्देश आहे.साहित्यिकांचे लेखन सजग वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा सृजन सोहळा आयोजित केला जातो.