आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiware Bazar Is One Of The Ideal Village, Said Mane

हिवरेबाजार ग्रामसभा देशाला दिशादर्शक, जिल्‍हा कृषी अधिक्षक माने यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री घेतलेली ग्रामसभा आदर्श आहे. सरत्या वर्षाचा आढावा घेत नवीन वर्षाचे नियोजन ग्रामस्थ एकत्र येऊन करतात, हा उपक्रम राज्यालाच नव्हे, तर देशाला दिशा देणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले.
हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी 31 डिसेंबरला आदर्श ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माने बोलत होते. यावेळी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार, हिवरे बाजारच्या सरपंच सुनीता पवार, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, नीलेश शिंदे, एस. टी. पादगीर, शिवाजी आमले, डॉ. लक्ष्मण खोडदे आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, वर्षभरात झालेल्या कामांचा तसेच घडामोडींचा आढावा व नवीन वर्षातील नियोजन ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात. विशेष म्हणजे ग्रामसभेचे आयोजन रात्री करण्यात आले असतानाही महिला मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत. सभेत ग्रामस्थांनी सभेला उपस्थित असलेल्या विविध विभागांतील शासकीय अधिकार्‍यांना प्रश्न विचारले, यावरूनच ग्रामस्थांची जागरूकता दिसून येते. 31 डिसेंबर ग्रामसभा घेऊन साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम राज्यालाच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
9 वर्षांपासून ग्रामसभा
वर्षाला निरोप देताना त्या वर्षभरात केलेल्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. या विचारातून हिवरे बाजारला नऊ वर्षांपासून आदर्श ग्रामसभा घेण्याची परंपरा आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांचा थेट सुसंवाद होत असल्याने कामे मार्गी लागतात. तसेच ग्रामस्थांच्याही शंकांचे निरसन होते.’’ पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव समिती.
गावच्या विकासासाठीच्या सर्व विषयांना मिळाली मंजुरी
ग्रामसभेत 15 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते, या विषयांवर सविस्तर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. आकडामुक्त अभियानांतर्गत रोहित्रेनिहाय शेतकर्‍यांचे गट तयार करणे, थकबाकीवर चर्चा करणे, नवीन रेशनकार्डचे वाटप करणे, महात्मा फुले जल व भूमी अभियानांतर्गत नाले दुरुस्त करणे, यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, ग्रामीण पर्यटन, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे बांधणे आदी विषयांचा त्यात समावेश होता.