आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्यामोहळाचा हल्ला; 105 विद्यार्थी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - निसर्ग सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर आग्यामोहळाने हल्ला केल्यामुळे 105 विद्यार्थी व 5 शिक्षिका जखमी झाल्याची घटना सोमवारी बदनापूर परिसरात घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने बदनापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गंभीर जखमी झालेले शमदीन शेख (11), शेख युनूस (9), आरती शिनगारे (10), शिक्षिका एस.जे. कोळकर, पी.पी. कल्याणकर यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बदनापूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 150 विद्यार्थिनी व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेतील 70 विद्यार्थ्यांची संयुक्त सहल 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता रेल्वेस्टेशन जवळील गणेशबाबा मंदिरात नेण्यात आली होती. झाडावरील आग्यामोहळ उठले आणि मधमाशांनी हल्ला चढवला. यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. शिक्षकांना आणि पालकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शाळा गाठून जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक बी. आर. साळवे, वैद्यकीय अधिकारी जे. बी. येवतीकर, के. एस. भारती यांनी उपचार केले.