आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ घोड्याचे दुर्दैव..मंत्र्याच्‍या गाडीला धडकून उपचाराअभावी मृत्‍यू, पोलिसांची वेगळीच तत्‍परता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.

शिर्डी - मंत्र्यांच्या सरकारी गाडीवर घोडा उधळल्याने गाडीचे नुकसान झाले. पोलिसांनी घोड्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली. मात्र, घोड्यावर उपचारांसाठी कोणतीही मदत केल्याने त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदासाठी पोलिसांचे पत्र नसल्याने डॉक्टर शवविच्छेदन करत नाहीत, अशी स्थिती आहे.

 

मंगळवारी नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मंगल कार्यालयातील लग्न समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांची गाडी रस्त्यावर उभी होती. याचवेळी दुसरा नवरदेव मिरवण्यासाठी घोडा रस्त्यावर आला. दरम्यान, याचवेळी तेथे आलेल्या ट्रक चालकाने गर्दी असल्याने हॉर्न वाजवला. आवाजाने घोडा उधळून मंत्र्यांच्या गाडीवर जाऊन आदळला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले घोडाही गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घोडामालकावर तातडीने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी दाखविलेली तत्परता घोड्यावर उपचारासाठी मात्र दाखविली नाही. गरीब असलेला घोडा मालक घोडयास घेऊन उपचारासाठी डाँक्टरकडे गेले मात्र पोलीस केस असल्याने डाँक्टरांनी वेळ काढुपणा केला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता डॉक्टरांनी उपचार केले. मात्र तोपर्यंत घोड्याने प्राण सोडले होते. उपचारात विलंब झाल्‍यामुळे मुळे घोड्याचा अंत झाला. त्यात शेवटच्या विधीला सतराशे विघ्न आल्याने घोडे मालकास कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

 

बातम्या आणखी आहेत...