आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात उद्या मोफत आयुष शिबिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रूग्णालयातील आयुष विभागाच्या वतीने मंगळवारी (१० फेब्रुवारी) मोफत आयुष निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणार असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार दिलीप गांधी व सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
मधुमेहावर आयुर्वेद व योगोपचार, सर्दी व दम्यावर होमिओपॅथी आणि सांध्यांच्या आजारावर युनानी उपचार केले जाणार आहेत. शिबिरासाठी ओपीडी क्रमांक 40 येथे नावनोंदणी सुरू आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी शिबिराआधी रक्तातील साखरेची तपासणी करून घ्यावी, शिबिराला येताना उपचारांसंबंधी जुने रिपोर्ट आणावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांनी केले आहे.

आयुष कार्यक्रमात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी चिकित्सा पद्धतींद्वारे उपचार केले जातात. पुरातन काळापासून या उपचार पद्धती भारतात वापरल्या जातात. नगर जिल्ह्यात ८ ठिकाणी शासकीय रूग्णालयांमध्ये आयुष उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. मंगळवारी होणाऱ्या शिबिरात औषधोपचारांबरोबर आजार होऊ नये, याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शौनक मिरीकर यांनी दिली.