आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातील सावळागोंधळ थांबेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या पिळवणुकीचा प्रकार सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणला. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. या विषयावर सव्वातास चर्चा झाली. ‘‘रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी एजंट असून त्यांचे खासगी दवाखाने आहेत. रुग्णाच्या कानात सांगून त्यांना ते घेऊन जातात,’’ असा घणाघाती आरोप सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला. संपूर्ण सभागृहाने याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला निवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी एबीएल शाळांबाबत माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाबाबत ‘दिव्य मराठीत’ सुरू असलेल्या वृत्तमालिकेची जोरदार दखल घेण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांबळे यांनी राजीव गांधी आरोग्य योजनेबाबत माहिती दिली. लगेच सदस्य हराळ यांनी रुग्णालयात होणार्‍या रुग्णांच्या पिळवणुकीविषयी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरून औषधे व इतर उपचार साहित्य आणावे लागते. यावर डॉ. कांबळे म्हणाले, अस्थिरोग विभागात रुग्णांच्या जागृतीसाठी फलक लावला आहे. कोणीही बाहेरून औषधे आणू नयेत, अशी त्यावर सूचना लिहिली आहे. रुग्णांच्या पिळवणुकीप्रकरणी चौकशीचे आदेश काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर हराळ म्हणाले, रुग्णालयात रुग्णांचे हाल सुरू असताना योजनांचे थोतांड कशासाठी सांगता? हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना महागडे स्टीलचे रॉड बाहेरून आणायला लावण्याचा प्रकार घडत आहे. जे आणण्यास नकार देतात, त्यांच्यावर शस्त्रक्रिया न करता जबरदस्तीने घरी परत पाठवण्यात येते. हा प्रकार गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. तुमचे वैद्यकीय अधिकारीच एजंटगिरी करत असून त्यांचे खासगी दवाखाने आहेत. हळूच रुग्णाच्या कानांत सांगून त्यांना घेऊन जाण्याचा प्रकार घडतो. एखाद्या गरोदर मातेला घरपोच करण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे, पण तुमच्याकडे याचा हिशेब आहे काय? किती रुग्णांना बाहेरून इंजेक्शनच्या सुया आणाव्या लागतात, याची माहिती सांगा.

‘दिव्य मराठी’ने हा प्रकार समोर आणला. मला रुग्णालयात काय चालते हे माहिती आहे. प्रसंगी एजंटांची नावे जाहीर करू. जो रॉड बाहेरून आणायला सांगितला जातो, त्यावर किंमतही नसते, असे हराळ म्हणाले. लंघे यांनी असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या पिळवणुकीचा प्रकार सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणला. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. या विषयावर सव्वातास चर्चा झाली. ‘‘रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी एजंट असून त्यांचे खासगी दवाखाने आहेत. रुग्णाच्या कानात सांगून त्यांना ते घेऊन जातात,’’ असा घणाघाती आरोप सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला. संपूर्ण सभागृहाने याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला निवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी एबीएल शाळांबाबत माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाबाबत ‘दिव्य मराठीत’ सुरू असलेल्या वृत्तमालिकेची जोरदार दखल घेण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांबळे यांनी राजीव गांधी आरोग्य योजनेबाबत माहिती दिली. लगेच सदस्य हराळ यांनी रुग्णालयात होणार्‍या रुग्णांच्या पिळवणुकीविषयी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरून औषधे व इतर उपचार साहित्य आणावे लागते. यावर डॉ. कांबळे म्हणाले, अस्थिरोग विभागात रुग्णांच्या जागृतीसाठी फलक लावला आहे.

कोणीही बाहेरून औषधे आणू नयेत, अशी त्यावर सूचना लिहिली आहे. रुग्णांच्या पिळवणुकीप्रकरणी चौकशीचे आदेश काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर हराळ म्हणाले, रुग्णालयात रुग्णांचे हाल सुरू असताना योजनांचे थोतांड कशासाठी सांगता? हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना महागडे स्टीलचे रॉड बाहेरून आणायला लावण्याचा प्रकार घडत आहे. जे आणण्यास नकार देतात, त्यांच्यावर शस्त्रक्रिया न करता जबरदस्तीने घरी परत पाठवण्यात येते. हा प्रकार गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. तुमचे वैद्यकीय अधिकारीच एजंटगिरी करत असून त्यांचे खासगी दवाखाने आहेत. हळूच रुग्णाच्या कानांत सांगून त्यांना घेऊन जाण्याचा प्रकार घडतो. एखाद्या गरोदर मातेला घरपोच करण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे, पण तुमच्याकडे याचा हिशेब आहे काय? किती रुग्णांना बाहेरून इंजेक्शनच्या सुया आणाव्या लागतात, याची माहिती सांगा.

‘दिव्य मराठी’ने हा प्रकार समोर आणला. मला रुग्णालयात काय चालते हे माहिती आहे. प्रसंगी एजंटांची नावे जाहीर करू. जो रॉड बाहेरून आणायला सांगितला जातो, त्यावर किंमतही नसते, असे हराळ म्हणाले. लंघे यांनी असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांच्या पिळवणुकीविरोधात सभेत प्रश्न उपस्थित करताना सदस्य अँड. सुभाष पाटील व बाळासाहेब हराळ. छाया : कल्पक हतवळणे

जिल्हा रुग्णालयात सोमवारी अस्थिरोग विभागात डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णांना तीन तास ताटकळत उभे राहावे लागले.

गांभीर्यच नाही
भाच्याला घेऊन सकाळी सव्वानऊला रुग्णालयात आलो. त्याच्या पायाला फॅ्रर झाले आहे. डॉक्टरच नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला. मात्र, डॉक्टर आले नाहीत. ओपीडीची वेळ संपल्यावर ते आले.’’ अरुण घोरपडे, रुग्णाचे नातेवाईक.

किती वेळ थांबावे..
हाताचा कोपरा दुखावला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात येत आहोत. मात्र, डॉक्टरच जागेवर नाहीत. सोमवारी सकाळी नऊपासून थांबलो आहोत. साडेबारापर्यंत डॉक्टर आले नाहीत. आम्ही किती वेळ थांबायचे? संगीता जावळे, गुंडेगाव, रुग्ण.

शस्त्रक्रियेतही भ्रष्टाचार!
जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात. रुग्णालयातील रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयात पाठवले जाते. आम्ही रस्त्यातला भ्रष्टाचार समजू शकतो, पण शस्त्रक्रियेतला भ्रष्टाचार आम्हाला मान्य होणार नाही, असे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी सुनावले. हे सर्व मुद्दे ‘दिव्य मराठी’ने आपल्या वृत्तमालिकेत उपस्थित केले होते.

रिक्त पदांचे काय झाले?
रुग्णांच्या पिळवणुकीबाबत अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी आक्रमक भूमिका घेतली. तुमची यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही. स्थायी समितीच्या, तसेच सर्वसाधारण सभेत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी आढावा सादर करावा. रिक्त पदांबाबत आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे का, असे विचारत लंघे यांनी आरोग्य यंत्रणांना कडक सूचना दिल्या.