आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अन्न हे पूर्ण ब्रह्म' मानून नगर शहरातील हॉटेल चालकांनी घेतले स्वच्छतेचे व्रत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वैशालीगांधी यांच्या "मेक इट हायजिन फर्स्ट' या सेवाभावी उपक्रमास शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. अनेक हॉटेलचालक स्वत:हून या उपक्रमात सहभागी होत आहेत. अन्नपदार्थ तयार करण्यापासून ग्राहकांना अन्नपदार्थ देण्यापर्यंतच्या
प्रक्रियेत स्वच्छतेला महत्त्व देण्याचे व्रत या हॉटेलचालकांनी घेतले आहे. त्यामुळे नगर शहराच्या खाद्यसंस्कृतीला आता स्वच्छतेची नवी ओळख मिळणार आहे.
रुचकर चविष्ट खाद्यपर्थांसाठी अनेक हॉटेल, मिठाईची दुकाने प्रसिद्ध आहेत. शहरातील खवय्यांची संख्या मोठी असल्याने या हॉटेल स्टॉल्सवर मोठी गर्दी असते. खवय्यांना स्वच्छ अन्नपदार्थ मिळून त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या सेवाभावी उद्देशाने वैशाली गांधी यांनी
"मेक इट हायजिन फर्स्ट' हा उपक्रम हाती घेतला आहे. अन्न हे पूर्णब्रह्म ग्राहक देवो भव या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून ग्राहकांनादर्जेदार स्वच्छ अन्नपदार्थ दिले, तर व्यवसायात वाढ होऊन ग्राहकांनाही समाधान मिळेल. यासाठी गांधी यांनी "मेक इट हायजिन फर्स्ट' हा उपक्रम सुरू केला.
क‍िचनमधील उपकरणांची स्वच्छता, कर्मचाऱ्यांसाठी हातमोजे, अॅपरन, टोपी, स्वच्छ भांडी या बारीकसारीक गोष्टींचा विचार करून स्वच्छता ठेवता येत असल्याचे गांधी यांनी हॉटेलचालकांना पटवून दिले. त्यासाठी मिठाई व्यावसायिक असोसिएशनच्या सहकार्याने सर्व व्यावसायिकांसाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली. गांधी यांच्या स्वच्छतेबाबतच्या संकल्पनेचे महत्त्व हॉटेलचालकांना समजले आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमात अनेक हॉटेलचालक स्वत:हून सहभागी होत आहेत. या उपक्रमासाठी अशोक कटारिया, डॉ. रोहित गांधी, मनीष बोरा, विजय कटारिया, विजय देशपांडे, संतोष कटारिया, प्रसाद बेडेकर, नवीन दळवी, शुभम झिने, हर्षल कांबळे आदी सहकार्य करत आहेत.
पर्यटकांसाठी स्वच्छता
नगरलाभेट देणारे देश-व‍िदेशातील पर्यटक स्वच्छ हॉटेलला प्राधान्य देतात. त्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.
प्रमाणपत्र लोगो
याउपक्रमात सहभागी झालेल्या व्यावसायिकांना लवकरच स्वच्छतेचे प्रमाणपत्र लोगोचे वाटप करण्यात येणार आहे. जे हॉटेल स्वच्छतेचे नियम सातत्याने शंभर टक्के पाळतील, त्यांनाच हे प्रमाणपत्र लोगो मिळणार आहे. उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला स्वच्छतेमध्ये
कमालीचे सातत्य ठेवावे लागणार आहे. तसे झाल्यास त्यांचे प्रमाणपत्र लोगो काढून घेण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांग‍ितले.
यांचा आहे सहभाग
कैलासउडपी, हॉटेल आयरीश, हॉटेल राजनंद, इंडियन नॅचरल, बाबासाहेब भेळ, सोपानराव वडेवाले, बबनराव वडेवाले, माय टीफीन, दिलीप सँडविच, महाराज पाणीपुरी, जैन समोसा असे अनेक व्यावसायिक गांधी यांच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू
आहे. या दिवसांत माशांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे रोगराई वाढू शकते. त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.