Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | house painting for diwali

नव्या ट्रेंडची रंगरंगोटी

उमेश अनपट | Update - Oct 21, 2011, 09:04 AM IST

दिवाळीत घर रंगवण्याचा लोकांचा उत्साह महागाईच्या दिवसांतही टिकून आहे. रंगांमध्ये उपलब्ध झालेल्या नव्या प्रकारांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

 • house painting for diwali

  नगर - दिवाळीत घर रंगवण्याचा लोकांचा उत्साह महागाईच्या दिवसांतही टिकून आहे. रंगांमध्ये उपलब्ध झालेल्या नव्या प्रकारांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
  कच्चा माल, इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने रंगांच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे दिवाळीतील घराच्या रंगकामाचे गणित काहीसे कोलमडले आहे. रंगनिर्मितीमधील प्रमुख घटक असलेल्या टिटॅनियम डायॉक्साईडच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने गेल्या वर्षभरात किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली. पश्चिम भारतातील काही प्रकल्प बंद पडल्याने यामध्ये आणखी भर पडली. महाग का असेना, परंतु टिकाऊ रंगांनाच लोक पसंती देताना दिसतात. रंगांचे विविध प्रकार लोकांना भावत असल्याने त्यासाठी लोक खिशाचा बेरंग झाला तरी चालेल, परंतु रंगांची खरेदी करीत आहेत.
  इकोफ्रेंडली ट्रेंड : पर्यावरणाचा ऱहास होऊ नये यासाठी अनेक इकोफ्रेंडली वस्तू बाजारात येत आहेत. रंगांचा बाजारही यात मागे नाही. गेल्या दोन वर्षांपासून इकोक्लीन हा इकोफ्रेंडली रंग बाजारात आला आहे. ग्राहक काही प्रमाणात या रंगाची मागणी करतात. या रंगास उग्र वास नाही. हा पाण्यामध्ये मिसळून दिला जातो. टर्पेंटाइन, रॉकेल यांच्या मिश्रणापासून तयार होणाºया रंगांचा वेगळाच वास येतो.

  रंगांच्या किमती, झालेली वाढ कंसात
  इमल्शन - 100 ते 400 रुपये लीटर (20 ते 75 रुपये)
  डिस्टेंपर - 55 ते 70 रुपये लीटर (10 ते 20 रुपये)
  लस्टर - 200 रुपये लीटर (25 रुपये )
  उलाढाल 21 हजार कोटी
  देशातील रंग उद्योगाची उलाढाल 21 हजार कोटी रुपयांची असून संघटित उद्योगाचा यातील वाटा ६5 टक्के आहे. उर्वरित 35 टक्के वाटा असंघटित क्षेत्राचा आहे. रंग निर्मितीसाठी येणाऱया एकूण खर्चात कच्च्या मालाचा वाटा जवळपास ६0 टक्क्यांच्या आसपास आहे.
  विक्री जोरात
  रंगाचे भाव वाढल्याने विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. एकदा दिलेला रंग बदलण्याची वेळ लगेच येऊ नये म्हणून ग्राहक दर्जेदार रंगांची मागणी करतात.
  बजेट बिघडले
  दिवाळीच्या सणाआधी घराची रंगरंगोटी केली जाते पण रंगांचा वाढता खर्च आणि मजुरी असा दुहेरी भार सहन करावा लागत आहे.
  विवेक गायकवाड,(ग्राहक) हडको

Trending