आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडीत एकाच रात्री 6 ठिकाणी घरफोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
नगर - सावेडी,बालिकाश्रम रोड, पाइपलाइन रोड परिसरात चोरट्यांनी बुधवारी पहाटे धुमाकूळ घातला. अवघ्या आठ तासांच्या कालावधीत सहा वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून दागिने रोकड लांबवली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सहा स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 
 
निर्मला अमित रोठे यांचे बालिकाश्रम रोडवरील आदर्श इलाईट फेजर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून रोकड सोन्याचे दागिने असा सुमारे २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेजारीच राहणाऱ्या सरिता जगन्नाथ सूर्यवंशी यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. 
 
पाइपलाइन रोड परिसरातील भिस्तबाग चौकाशेजारच्या महादेव अपार्टमेंटमधील संगीता अशोक भोसले, यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्या घरातही चोरट्यांनी उचकापाचक करून सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोकड चोरून नेली. प्रेमदान हडको परिसरातील मनीषा संदीप साळे यांच्या घरातील कपाटातून लाख हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच रंजना बाळासाहेब खेडकर यांच्या घरातून ३३ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. कुष्ठधाम रोड परिसरातील राजश्री विनोद अड्डलवार यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. नंतर आतील समानाची उचकापाचक करून ७४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोकड चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हे नोंदवले आहेत. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपास करीत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...