आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणीच्या जबाबदारीबरोबर ‘ती’ करते बसची दुरुस्ती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकविसाव्या शतकात महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्यातील गुणवत्ता दाखवून देत आहेत. महिलांना पुरुषांसोबत काम करत असल्या, तरी अवजड कामे त्या करू शकत नाहीत असे बोलले जाते. पण महिला अवजड कामे करण्यातही समर्थ असल्याचे नेवासे आगारातील मेकॅनिक शोभा आसाराम चंदने यांनी दाखवून दिले आहे. 
 
घरातील जबाबदारी सांभाळून गेली दहा वर्षे एसटी डेपोमध्ये बसची दुरुस्ती करणाऱ्या शोभा यांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पाना, स्क्रू ड्रायव्हर घेऊन संपूर्ण बस खोलून बिघाड काय आहे, हे शोधून दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेवासे आगारातील चाळीस-पन्नास मेकॅनिकमध्ये त्या एकमेव महिला मेकॅनिक आहेत. 

शोभा यांना लहानपणापासूनच वडिलांमुळे या क्षेत्राची अावड होती. दहावीनंतर आयटीआयमध्ये जाण्याचे त्यांनी ठरवले. आयटीआय पूर्णही केले. नंतर शोभा यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांना एसटी डेपोमध्ये मेकॅनिकच्या जॉबची ऑफर आली. सासरच्या मंडळींनी होकार दिला. मागील दहा वर्षांपासून त्या मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत श्रीरामपूर, नेवासे येथे सेवा केली आहे. 
 
मेकॅिनक म्हणून काम करणे अवघड असते. संपूर्ण बसची व्यवस्थित दुरुस्ती करावी लागते. एकदा संपूर्ण बस दुरुस्त झाली. तेवढ्याच शोभा यांचे लक्ष जॉइंट ब्रॅकेटवर गेले. ते तुटलेले होते. लगेच त्यांनी ते दुरुस्त केले. ते दुरुस्त केले नसते, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. शोभा चंदने यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याबद्दल आगारप्रमुखांनी त्यांचा सत्कार केला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...