आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपासनेत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर पहिली मंडळी (काँग्रिगेशनल) ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये भक्ती करण्यास जाणाऱ्या धर्मगुरु भाविकांना अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. गेल्या दोन रविवारी चर्चमध्ये वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांशी चर्चा करून प्रशासनाने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, चर्चचे हंगामी मॉडरेटर रेव्हरंड सी. बी. उजागरे यांचे २१ फेब्रुवारीला निधन झाले. नगर चर्च कौन्सिल पीटीआर क्रमांक डी- या संस्थेने रेव्हरंड उजागरे यांची नियुक्ती केली होती. उजागरे यांच्या निधनानंतर त्याच कौन्सिलने रेव्हरंड सनी पंडितराव मिसाळ यांची हंगामी मॉडरेटर म्हणून नियुक्ती केली. ते २८ फेब्रुवारीला चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी गेले असता विरोधी मंडळाने त्यांना त्यांच्या समवेत असणाऱ्या रेव्हरंड सुनील भांबळ यांना अटकाव करून शिवीगाळ धक्काबुक्की केली. विरोध होऊनही रेव्हरंड मिसाळ यांनी भक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी मंडळाकडून चर्चचा मुख्य दरवाजा बंद करून भाविकांना आत जाण्यास मज्जाव केला. यातून चर्चचे पावित्र्य भंग पावत आहे. भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून चर्चमध्ये अनुचित प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलकांना देण्यात आले. हंगामी मॉडरेटर रेव्हरंड सनी मिसाळ, नगर चर्च कौन्सिलचे सचिव रेव्हरंड सुनील भांबळ, रेव्हरंड संजय मिसाळ, नंदप्रकाश शिंदे, प्रकाश कांबळे, रुबेन त्रिभुवन, विनोद भालेराव, पी. जी. घोडके उपस्थित होते.

ह्यूम चर्चमध्ये धर्मगुरु भाविकांना उपासना करण्यास मज्जाव करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी चर्चचे हंगामी मॉडरेटर रेव्हरंड सनी मिसाळ नगर चर्च कौन्सिलचे सचिव रेव्हरंड सुनील भांबळ यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले.
बातम्या आणखी आहेत...