आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेच्या खून प्रकरणी पती व सासूला जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - तालुक्यातील अशोकनगर येथील विवाहितेस जाळून मारणा-या पती व सासूस जन्मठेप व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (४ फेब्रुवारी) सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने विधिज्ञ प्रमोद वलटे यांनी काम पाहिले. छाया साईनाथ रोकडे असे मृत विवाहितेचे, तर साईनाथ विश्वनाथ रोकडे (पती) व बबनबाई विश्वनाथ रोकडे (सासू) अशी आरोपींची नावे आहेत.

पती साईनाथ व सासू बबनबाई या दोघांनी छायाचा मानसिक छळ करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना ३ एप्रिल २०१२ रोजी घडली होती. तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबानुसार शहर पोलिस ठाण्यात त्यानुसार पती साईनाथ व सासू बबनबाई रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारादरम्यान छाया रोकडे हिचा मृत्यू झाला. छायाचा मृत्यूपूर्व जबाब पोलिस उपनिरीक्षक भारत बलय्या यांनी नोंदवला होता. याप्रकरणी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सरकारी वकील प्रमोद वलटे यांनी छायाचे वडील बाळासाहेब सदाशिव लोंढे व आई लक्ष्मीबाई बाळासाहेब लोंढे (रांजणगाव, ता. राहाता), शवविच्छेदन करणारे डॉक्टर श्रीकांत पाठक, कार्यकारी अधिकारी अनिल पवार, डॉ. अशोक कांबळे, उपनिरीक्षक बलय्या यांच्या साक्षी नोंदवल्या. न्यायाधीश शिंदे यांनी वलटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पती साईनाथ रोकडे व सासू बबनबाई रोकडे याना दोषी ठरवून छळप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंड तसेच खूनप्रकरणी दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.