आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जाळून मारणा-या पतीला जन्मठेपेची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पत्नीला जाळून मारणा-यात दोषी आढळलेल्या पतीला जिल्हा न्यायाधीश एस. के. केवले यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ऑगस्ट 2013 मध्ये ही घटना राजुरी (ता. जामखेड) येथे घडली होती.
नवनाथ लक्ष्मण माने (34, राजुरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे परस्त्रीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाला पत्नी मीना विरोध करत असे. अनैतिक संबंधास होणारा विरोधाच्या रागातून आरोपीने पत्नी मीना हिला 21 ऑगस्ट 2013 रोजी पेटवून दिले. मीनाच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.