आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमी संघटनेच्या वतीने आयोजित एमआयडीसीतील उद्योजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री राम शिंदे. समवेत एल अँड टी कंपनीचे जॉइट जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर, आमीचे अध्यक्ष अशोक सोनवणे, अभय आगरकर.)

नगर - नगरच्या औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे गृह खाते असले, मंत्रिमंडळातील आपले वजन वापरून हे प्रश्न सोडवेन, असे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरूवारी दिले.

एमआयडीसीतील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित आमी संघटनेच्या बैठकीत शिंदे बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, अशोक सोनवणे, अरविंद पारगावकर, दौलत शिंदे, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, उद्योगधंदे पुढे गेले, तरच शहरासह जिल्ह्याचा विकास होईल. औद्योगिक वसाहतीचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. उद्योगमंत्र्यांशी त्याबाबत चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेकींग ऑफ इंडियाचा नारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेकींग ऑफ महाराष्ट्राचा नारा दिला, त्याप्रमाणे आपणही मेकींग ऑफ अहमदनगरचा नारा देऊ. एमआयडीसी परिसरात होणाऱ्या चो-यांबाबत पोलिस अधीक्षकांना लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बैठकीत उद्योजकांनी विविध मागण्यांचे निवेदन शिंदे यांना दिले.


बातम्या आणखी आहेत...