आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटराव पवार यांचा देशव्यापी दौरा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार देशव्यापी दौ-यावर रवाना झाले. विविध चर्चासत्रांत ते ग्रामपंचायत व ग्रामसभांच्या बळकटीकरणाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. चंदीगड येथे १० ते १२ फेब्रुवारीला पंचायतराज मंत्रालयातर्फे "विकासात ग्रामपंचायतींचा वाटा' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या बळकटीकरणाने हिवरेबाजारने सर्वांगीण विकास साधला आहे. त्याच धर्तीवर देशातील इतर ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे कशी वाटचाल करता येईल, याबाबत पवार मार्गदर्शन करतील. 13 ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होशंगाबाद येथे मध्यप्रदेश नदी बचाव अभियानासाठी आयोजित चर्चासत्रात पवार सहभागी होतील. पर्यावरण उपाययोजनांबाबत ते मार्गदर्शन करतील. यावेळी माजी न्यायाधीश देवदत्त धर्माधिकारी, विधानसभेचे अध्यक्ष सीताराम शर्मा, अमृतलाल बेगड उपस्थित असतील.