आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिवरेबाजारमध्ये भावी पिढीवर संस्कार रुजवणार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आदर्शगाव हिवरेबाजारला आदर्श करण्यासाठी ग्रामस्थ राबत आहेत. आता या गावाचे भवितव्य नव्या पिढीच्या हातात आहे. त्यामुळे भावी पिढी खºया अर्थाने आदर्श करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती हिवरे बाजारचे प्रवर्तक, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.

प्रेस क्लबतर्फे स्वातंत्र्यदिनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची अभ्यास सहल आदर्श गाव हिवरेबाजार येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पवार यांनी ही माहिती दिली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते गावातील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी आयोजित विविध उपक्रम आणि स्पर्धांमधील विजेत्यांना पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. दिवसभरात गाव आणि शिवारात फिरून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना हिवरेबाजारची जडणघडण आणि भावी योजना जाणून घेतल्या. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला. पवार यांनी सांगितले, हिवरे बाजारच्या या बदलाचे श्रेय सर्वांना आहे. ग्रामस्थांनी निष्ठापूर्वक आणि संयमाने कामे केली. आता हेच संस्कार नव्या पिढीत रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शालेय जीवनापासून मुलांना पर्यावरणासोबतच आदर्श आचरणाचे धडेही देण्यात येत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून यासाठी गावात एक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

या प्रशिक्षण केंद्रात स्पर्धा परीक्षांतून प्रशासकीय सेवेत जाणाºया अधिकाºयांच्या प्रशिक्षणाची सोय होणार आहे. तरुणांना गावाबद्दल आकर्षक वाटेल, असे वातावरण आता गावात निर्माण होण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले. प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांनी आभार मानले.