आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Idol From The Sale Of Higher Education Funding News In Marathi

उच्च शिक्षणासाठीचा निधी जमवणार मूर्तींच्या विक्रीतून...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्नेहालय संस्थेतील विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांत फावल्या वेळेत काम करून शाडूच्या संपूर्ण नैसर्गिक रंगातील पर्यावरणपूरक अशा २०० गणेशमूर्ती बनवल्या. त्यातील काही मूर्ती बोस्टन, न्यूयॉर्क, वॉिशंग्टन डी. सी. आिण डेट्राईट येथील मराठी मंडळांपर्यंत पोहोचल्या आहेत. उर्वरित मूर्तींची विक्री करून जमा होणारा निधी मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून संस्थेत हा उपक्रम राबवला जात आहे.
मंजिरी आिण मंगेश कुटे हे मूळचे नगर येथील दाम्पत्य संगणक क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने बंगळुरू येथे राहते. या दाम्पत्याने स्नेहालयाच्या "अर्थ स्टुडिओ' उपक्रमाची जबाबदारी मे २०१३ मध्ये स्वीकारली. या उपक्रमाचे लोकार्पण १ मे २०१३ रोजी अिभनेते अमीर खान यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भद्रावती (जिल्हा चंद्रपूर) येथील प्रादेिशक कुंभारकला प्रशिक्षण केंद्र आिण बंगळुरू येथील अशाच प्रशिक्षणाद्वारे मातीच्या विविध वस्तू व नित्योपयोगी साधने बनवण्याचे प्रशिक्षण स्नेहालय संस्थेतील एचआयव्ही बाधित, तसेच कलेची आवड असणारे विद्यार्थी व महिलांना देण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी सूरज सुतार, जावेद शेख, मनोज अहिरे, अमर बगुर, अमित उजागरे, प्रदीप मोकाळे, मयूर शिंगारे,जितेंद्र सा‌ळवे, योगिता गाढवे, रेश्मा कांबळे आदी विद्यार्थ्यांनी १०, ११ व १२ इंचाचे गणपती तयार केले आहेत. या गणेशमूर्तींना विषारी नसलेली अंबेहाळद, नीळ, रक्तचंदन, तसेच भाज्यांपासून तयार केलेले संपूर्ण नैसर्गिक रंग देण्यात आले आहेत.
या उपक्रमासाठी मंजिरी कुटे यांना सुजाता पायमोडे व कला अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांनी मदत केली. अर्थ स्टुडिओतील वस्तू वर्षभर उपलब्ध असतात.
वेदर रॉकपासून तयार केल्या वस्तू
गणेशमूर्तींशिवाय चिनीमाती, वेदर रॉक अशा नैसर्गिक वस्तूंपासून अनेक नित्योपयोगी वस्तू अर्थ स्टुिडओत तयार करण्यात आल्या आहेत. बिगबझार, प्रोफेसर काॅलनी चौक (सावेडी) आिण गांधी मैदान येथील स्नेहालय भवनात या वस्तू व गणेशमूर्तींची विक्री केली जात आहे. अधिक माहितीसाठी ९९०१५७७३३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्नेहालय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.