आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Chief Minister Not Took Decision On Fund , So Resign From Corporator Post

निधीबाबत मुख्‍यमंत्र्यांनी तोडगा न काढल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्य शासनाकडून मिळणार्‍या निधीवर सत्ताधारीच दरोडा टाकत आहेत. त्यामुळे ‘आई जेऊ घालीना अन् बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था काँग्रेसच्या नगरसेवकांची झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर नगरसेवक पदाबरोबरच पक्षालाही रामराम ठोकण्याचा निर्णय काँग्रेसचे नगरसेवक सुनील कांबळे यांनी घेतला आहे.

महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आल्यापासून काँग्रेसच्या नगरसेवकांची कामे हाणून पाडली जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही. राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता असूनही न्याय मिळत नसेल, तर सत्तेचा उपयोग काय असा सवाल कांबळे यांनी केला आहे. शासनाने मनपाला मूलभूत सोयी-सुविधांसाठी 25 कोटींचा निधी दिला. या निधीचे नगरसेवकांना समान वाटप करून सर्वांना समान न्याय देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. मागच्या महिन्यात झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या निधीतून प्रत्येक वॉर्डातील कामांबाबत निर्णय घेण्यात आला. त्यात काँग्रेस नगरसेवकांच्या वॉर्डात सुमारे 50 लाखांची कामे घेण्यात आली. सभेचा ठराव आल्यानंतर मात्र ही कामे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सत्ताधारी जाणीवपूर्वक काँग्रेसच्या नगरसेवकांची कामे हाणून पाडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (25 जुलै) बोलावलेल्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही, तर नगरसेवक पदाबरोबरच पक्षालाही रामराम ठोकणार असल्याचा निर्णय कांबळे यांनी घेतला आहे.