आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Jaikwadi's Water Not Released,serious Condition Will Be In Aurangabad Balasaheb Thorat

जायकवाडीला पाणी दिले नसते तर औरंगाबादची स्थिती गंभीर असती - बाळासाहेब थोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- ‘काहीजण दुष्काळाचेही राजकारण करीत आहेत. आपल्या 35 वर्षांच्या राजकीय कार्यकाळात काहीही न करणा-यांना आता दुष्काळात सुबुद्धी सुचली आहे’, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर गुरूवारी टीका केली. जायकवाडीला पाणी दिले नसते, तर आज औरंगाबादचे चित्र आता गंभीर बनले असते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब विखे यांनी मागील आठवड्यात संगमनेर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. त्या वेळी त्यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना थोरात म्हणाले की, संकट काळात राजकारण करू नये, अशी आपली व सरकारची भूमिका आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत एकत्रित काम करण्याऐवजी काहीजण सोयीचे राजकारण करीत आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या संगमनेर तालुक्याला न मागता खूप काही दिल्याचेही थोरात यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली.

दुष्काळ निवारणाचे मॉडेल
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. शेकडो किलोमीटरवरून टँकर्सने पाणी आणावे लागते. मागील वर्षी संगमनेर तालुक्यात 66 टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागला. 300 टँकर्सच्या मदतीने शेतक-यांनी डाळिंबाच्या बागा वाचवल्या. छावण्या, चारा डेपो, तसेच रोहयोची कामे यातून दुष्काळ निवारणाचे प्रयत्न झाले. हा राज्यात आदर्श असल्याचे थोरात म्हणाले.