आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅल्शियम कार्बाइडने आंबा पिकवणारे रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अवघ्या काही तासांत कैरीचे आंब्यात रूपांतर करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड या घातक रसायनाचा सर्रास वापर केला जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने कंबर कसली असून तीन दिवसांपूर्वीच श्रीरामपूर येथे कारवाई करण्यात आली.
पिवळे धमक रसाळ आंबे बाजारपेठेत दिसतात, पण यापैकी कार्बाइडने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न आैषध प्रशासनाने व्यापक मोहीम उघडावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नका, त्याऐवजी इथिलिन गॅसचा वापरा, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. तथापि, कार्बाइडचा वापर आंबे पिकवण्यासाठी केला जातो. कॅल्शियम कार्बाइडमुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन आंबा लवकर पिकतो. मात्र, अशा पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळे तोंडाला फोड येणे, त्वचेवर दाण्यासारखे डाग पडणे आणि पचनसंबंधी विकार असे दुष्परिणाम दिसून येतात. आंबे पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अन्न आैषध प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील एका दुकानावर अन्न आैषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या वेळी आढळून आलेला दोन ते अडीच टन आंबे नष्ट करण्यात आले.
शहरासह जिल्हाभरात राज्यातून, तसेच परराज्यांतून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू आहे. पण हा आंबा कोणत्या पद्धतीने पिकवला जातो, याबाबत नागरिकांनीही जागरूक राहणे आवश्यक आहे. परंतु शासनाकडून यासंदर्भात जागृती केली जात नसल्याने कार्बाइडने आंबे पिकवणाऱ्यांचे फावत आहे. कार्बाईडने पिकवलेला आंबा कसा ओळखावा, त्याचे धोके काय याबाबत माहिती नसल्याने नागरिक दर्जेदार आंबा म्हणून या विषारी आंब्यांची खरेदी करतात.
कॅन्सर होण्याची भीती
- कॅल्शिअम कार्बाईड हे विषारी रसायन असून त्यात फॉस्फोरस अर्सेनिकचेही अंश असतात. आंब्यांतून ते पोटात गेल्यास मळमळ, छातीत जळजळ, डोके दुखणे, डोळ्यासमोर अंधारी, जुलाब आदी लक्षणे दिसून येतात. पोटात अॅसिटिलीन गॅस तयार होऊन मज्जासंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतात. कॅल्शिअम कार्बाईडमुळे कॅन्सरही होऊ शकतो. पुढील काही वर्षात अधिक संशोधनानंतर याबाबतची कारणे समोर येतील.''
डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पोटाचे विकार उद्भवतात...कसा ओळखावा कार्बाईडने पिकवलेला आंबा?
बातम्या आणखी आहेत...