आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If Not Built Flyover, Then I Will Go On Strike Say MLA Rathod

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उड्डाणपुलासाठी मुंबईत उपोषण करू, आमदार अनिल राठोड यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उड्डाणपूल व्हायलाच हवा. उड्डाणपुलासंदर्भात कार्यवाहीसाठी दहा दिवस वाट पाहणार आहे. हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात उपोषणास बसू, असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

राठोड म्हणाले, स्टेशन रस्त्यावर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पूल नसल्याने सतत वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी मी उपोषण केले. त्यानंतर मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हा पूल न होताच ठेकेदाराने टोलवसुली सुरू केली आहे. पुलासाठी जागा उपलब्ध नव्हती, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात जागा उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू व्हायला हवे होते. यासंदर्भात चार वेळा ठेकेदाराला नोटिसा दिल्या, आणखी किती नोटिसा तुम्ही देणार आहात? पुलाची बाब कुणीही गांभीर्याने घेत नाही. फक्त कायदेशीर नोटीस देण्यास सांगतात. यासंदर्भात झालेल्या बैठकीत दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक कार्यवाही न झाल्यास अकराव्या दिवशी 1 सप्टेंबरला मंत्री भुजबळ यांच्या दालनात मी उपोषणास बसणार आहे, असे ते म्हणाले.

सध्या ठेकेदारामार्फत सुरू असलेली टोलवसुली शासनाने ताब्यात घ्यावी; अथवा टोल बंद करावा. उड्डाणपुलाच्या ज्वलंत प्रश्नासाठी एका आमदाराला उपोषण करावे लागते, तर सर्वसामान्य जनतेची काय व्यथा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे राठोड म्हणाले.