आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिष्ठा जपता येत नसेल, तर पद सोडा - आमदार जगताप यांना देवगावकरांचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये गेल्या काही वर्षांपासून गलिच्छ व लाजिरवाणा कारभार सुरू आहे. याचा फटका दर्जेदार खेळाडूंना सोसावा लागतो. खेळाची प्रतिष्ठा जपता येत नसेल, तर पद सोडा, अशा आशयाचे निवेदन क्रिकेट प्रशिक्षक मुकूंद देवगावकर यांनी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले की, असोसिएशनच्या गलथान कारभाराबाबतच्या अनेक तक्रारी अध्यक्षांकडे केल्या. मात्र, त्यांनी त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. राजकीय व्यापामुळे असोसिएशनकडे लक्ष देता येत नसेल, तर अध्यक्षांनी राजीनामा देऊन सक्षम व्यक्तीकडे कारभार द्यावा.क्रिकेटच्या अधोगतीला व बदनामीला असोसिएशनच जबाबदार आहे. क्षमता नसणा-या पदाधिका-यांबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. १९ वर्षांखालील निवड चाचणीत त्याचा प्रत्यय आला. क्षमता असणा-या खेळाडूंवर अन्याय करण्यात आला. तो दूर करण्याची जबाबदारी अध्यक्षांकडून टाळली गेली. याबाबत पालकांनी भेट घेतल्यानंतर अध्यक्षांनी अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुढे काहीही झाले नाही. पीयूष बडवे, किरण मखरे, अक्षय गोळे, सूरज नरसल या गुणी खेळाडूंवर झालेला अन्याय दूर झाला नाही. रास्त मागण्यांची पूर्तता करणे हे अध्यक्षांचे कर्तव्य आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याकडून हे होत नसल्याचे देवगावकर यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत केलेले आरोप व तक्रारी खोट्या असल्याचे असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सिद्ध करावे. हे जमत नसेल, तर त्यांनी पदांचे राजीनामे द्यावेत. स्वाभिमान गहाण ठेवून पदे उपभोगण्यापेक्षा खेळाडूंच्या भल्यासाठी त्यांनी राजीनामे द्यावेत. माझे जाहीर आव्हान स्वीकारून असोसिएशनने प्रतिसाद द्यावा.''
मुकुंद देवगावकर, तक्रारदार.