आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If V.K. Singh Go With Modi, Then No Connection Our With Him Anna Hazare

व्ही. के. सिंह मोदींबरोबर जाणार असतील, तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही- अण्‍णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - देशातील व्यवस्था परिवर्तन ही आमची भूमिका आहे, सत्तापरिवर्तन नव्हे. सत्तापरिवर्तनासाठी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह हे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जाणार असतील, तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही़, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्घी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
रेवाडी येथील माजी सैनिकांच्या मेळाव्यात मोदी यांच्यासमवेत सिंह यांनी हजेरी लावली होती़ याबाबत ते बोलत होते.

या संदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता अण्णा म्हणाले, देशातील व्यवस्थापरिवर्तनाची आमची भूमिका आहे़ सिंग हे मोदी यांच्याबरोबर जाणार असतील, तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही़ आम्ही लोकतंत्रासोबत आहोत़ लोकसभेत स्वतंत्र उमेदवार पाठवा ही आमची मागणी आहे़ सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता ही पक्षांची भूमिका आम्हाला मान्य नाही़ संविधानातही पक्ष व पार्ट्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे सिंग सत्तापरिवर्तनासाठी मोदींसमवेत जात असतील, तर ते जाऊ शकतात. त्यांच्याशी आमचा संबंध नाही़


आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी राजकीय मार्ग अनुसरून नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर हजारे यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली होती़ त्यानंतर माजी लष्करप्रमुख सिंग यांनी हजारे यांना देशपातळीवर साथ दिली होती़ अलीकडेच हजारे यांनी केलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेचे सिंग यांनीच नियोजन केले होते़ अमेरिकास्थित भारतीयांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठीही सिंग हजारे यांच्यासमवेत होते़ सिंग यांनी हजारे यांच्या भूमिकेविरोधात मोदींची पाठराखण केल्याने भविष्यात हजारे यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबरीने ‘एकला चलो रे...’ ही भूमिका घ्यावी लागेल.