आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा फलक पुन्हा पूर्वपदावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणूक आचारसंहितेच्या काळात फलकांवर धडाकेबाज कारवाई करणारे प्रशासन सध्या थंडावले आहे. बेकायदा फलक व अवैध वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आहे.
मनपा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर शहरातील चौक फलकांनी व्यापण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता कालावधीत सर्वाधिक कारवायांचा विक्रम करणारा उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आता पूर्ण थंडावला आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीचा शहर व परिसरात सुळसुळाट सुरू झाला आहे. आचारसंहितेत विनापरवाना फलक लावणार्‍यांविरुद्ध फौजदारी स्वरूपांचे गुन्हे दाखल करण्यात आले. 16 डिसेंबरला निकाल लागल्यापासून पुन्हा शहरातील प्रत्येक चौकात फलकांची गर्दी झाली आहे. नववर्ष, नाताळच्या शुभेच्या व विजयी उमेदवारांच्या फलकांनी गर्दी केली. आता मनपाच्या नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करणार्‍या फलकांची भर पडत आहे. विनापरवाना फलक लावणार्‍यांवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या आदेशाच्या आधारे पोलिस प्रशासनाने मनपाशी पत्रव्यवहारही केला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन पोलिसांनी आयुक्तांना दिले. मात्र, कारवाई झाली नाही.

कारवाईचे अधिकार पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला आहेत. थेट गुन्हे दाखल होत असल्याने आचारसंहिता कालावधीत विनापरवाना फलकांची संख्या कमालीची रोडावली. परंतु आता जैसे थे परिस्थिती होत आहे. आचारसंहिता कालावधीत सर्वाधिक कारवाई करण्यात आटीओचे पथक अग्रेसर होते. मात्र, आचारसंहितेसोबतच या विभागाच्या कारवायाही थांबल्या आहेत. त्यामुळे अवैध वाहतूक व बेकायदा फलक वाढले आहेत.

हात बांधलेत का?
4आचारसंहिता कालावधीत धडाक्यात कारवाई करणार्‍या प्रशासनाचे हात कोणी बांधले आहेत का? नियमानुसार कार्यवाही करणे प्रशासनाचे काम आहे. मात्र, निवडणुकीपुरती प्रशासनाकडून चपळता दाखवली जाते. एरव्हीही अशाच प्रकारची कारवाई प्रशासनाकडून अपेक्षित आहे.’’ अँड. श्याम आसावा, सामाजिक कार्यकर्ते.