आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा बांधकाम करणारी काँग्रेसची नगरसेविका अपात्र, जिल्हािधकाऱ्यांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर बांधकामास साथ देणाऱ्या संगमनेर पालिकेच्या सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेविका सुमित्रा दिड्डी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले.
शेख आफताब आमिनोद्दीन यांनी दिड्डी यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनादेखील प्रतिवादी करण्यात अाले होते. दिड्डी यांचे पती सिद्राम इरय्या दिड्डी भावाने स्वमालकीच्या जागेवर ३०० चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती. पालिकेने त्यांना स्टील्ट फ्लोअर, तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला बांधण्यास परवानगी दिली होती. मात्र, दिड्डी यांच्या पतीने आराखड्याप्रमाणे बांधकाम करता बेकायदेशीररित्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे बांधकाम केले. त्यामुळे जास्तीच्या बांधकामासंबंधी पालिकेने पोलिसांत फिर्याद दिली होती. तसेच न्यायालयातही दावा दाखल केेला आहे.

असा आहे आदेश
दिड्डीयांच्याविरोधातील उपलब्ध पुरावे, लेखी निवेदने, तोंंडी जाबजबाबान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आैद्योगिक नगरी अधिनियमान्वये जिल्हािधकारी कवडे यांनी सुमित्रा दिड्डी यांना दोषी ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. निर्णय प्राप्त होताच त्यांचे पद रिक्त होईल. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून राज्य शासनाकडे पंधरा दिवसांत अपील दाखल करू शकतील.
बातम्या आणखी आहेत...