आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा फलकांबाबत मनपा आयुक्तांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नवरात्रोत्सव व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा फलक लावण्यात आले आहेत. त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने केडगाव येथील तात्यासाहेब कोतकर यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना वकिलामार्फत नोटीस बजावली आहे.

नोटिशीत म्हटले आहे की, तथाकथित नेत्यांनी शहरातील विविध भागात बेकायदा फलक लावले आहेत. केडगाव देवी रस्ता, तसेच मंदिर परिसरात तर फलकांचा सुळसुळाट झाला आहे. हे फलक लावण्यासाठी मनपाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. फलकांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे. आयुक्तांसह मनपा कर्मचारी स्वत:ची जबाबदारी झटकून टाकत आहेत. फलकांमुळे होणारे अपघात व समाजातील सुव्यवस्थेला बाधा आल्यास त्याची सर्व जबाबदारी आयुक्तांवर राहील. फलक लावण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बेकायदा फलक तपासून ते जप्त करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास नेमून दिलेल्या कामात कुचराई केल्याप्रकरणी, तसेच जनतेचा पगार घेऊन त्याबदल्यात काम केले नाही, यासाठी दक्ष नागरिकांकडून आयुक्तांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. नोटीस देण्यास भाग पाडले म्हणून अडीच हजार रुपये नोटीस खर्च द्यावा, असेही नोटिशीत म्हटले आहे.