आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावठी कट्टे विक्रीप्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या गावठी कट्टे विक्रीप्रकरणाच्या व्याप्तीत वाढ होत आहे. अटकेतील आरोपींची संख्या चारवर पोहोचली असून त्यांच्याकडून तीन कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीतील इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

गावठी कट्टे विकण्यासाठी इमामपूर घाटात आलेल्या सागर सोनवणे व सागर गवळी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 ऑगस्टला सायंकाळी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू अण्णाराव सुतार (28, र्शीरामपूर) व साहेबा एकनाथ गव्हाणे (28, पानसवाडी, सोनई) या दोघांना शिंगवे तुकाई फाट्यानजिक 26 ऑगस्टला सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे मिळाली. न्यायालयाने या आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात निष्पन्न झालेल्या इतर आरोपींचा शोध बुधवारी सुरु होता.