आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर, युवकाला कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका युवकाला अटक केली आहे. लकी ऊर्फ रवी केवल दुग्गल (तारकपूर) असे आरोपीचे नाव आहे. लकीने अॅक्टिंग पल्स या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. त्यामुळे ग्रुपमधील काही सदस्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी शनिवारी मध्यरात्री कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात मोठा जमाव गोळा झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आरोपीला ताब्यात घेतले. रविवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचे पडसाद शहरात उमटू नयेत, याकरिता रविवारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक मालकर करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...